Advertisement

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये १४२ टक्के वाढ

कोरोनाव्हायरसच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. बरेच जिल्हे, ठिकाणं हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहेत.

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये १४२ टक्के वाढ
SHARES

कोरोनाव्हायरसच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. बरेच जिल्हे, ठिकाणं हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात २४ हजार ६४५ नवीन रुग्ण आढळले. तर ५८ रुग्णांचा मृत्यू नोंदवण्यात आला आहे. मात्र, मुंबईत देखील रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळत आहे.

मुंबईत सलग दुसर्‍या दिवशी ३ हजाराहून अधिक रुग्ण आढळले. सोमवारी मुंबईत सर्वाधिक ३ हजार २६२ रुग्णांसह १० कोरोनाव्हायरस रुग्णांचा मृत्यू झाला. महापालिकेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १ मार्चपासून शहरात सक्रिय प्रकरणांमध्ये तब्बल १४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

१ मार्च रोजी मुंबईत ९ हजार ६९० कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. आता २१ मार्चला हा आकडा २३ हजार ४४८ वर पोहोचला. यामुळे रूग्णालयात रुग्णांची वाढ झाली आहे. सामायिक आकडेवारीनुसार, ४७ टक्के बेड आता ताब्यात घेतले आहेत. अद्याप बेड्स रिक्तच राहण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे शहरातील जवळजवळ ७० टक्के नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत. पण त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण दिलासादायक म्हणजे मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आहे. मुंबईत मृत्यूचे प्रमाण १ टक्क्यांच्या आसपास आहे.

तथापि, कोरोनाव्हायरसच्या घटनांमध्ये होणारी वाढ पाहता, महानगरपालिका आयुक्त, इक्बालसिंग चहल यांनी शहरातील बेड १२००० वरून १८००० पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्स कॉलवर यासंदर्भात चर्रा केली.

आयुक्तांनी अधिका-यांना लहान नर्सिंग होमची गरज भासल्यास कोविड केअर युनिट म्हणून वापरण्यास सांगितलं आहे. शिवाय, खाजगी प्रयोगशाळांना चाचणी अहवाल रुग्णांना देण्याऐवजी प्रथम पालिकेकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले.

मंगळवारी, 23 मार्च रोजी वाढत्या घटनांचा विचार करता केंद्रानं घोषणा केली की कोरोनाव्हायरस लसीकरण मोहिमेचा पुढील टप्पा १ एप्रिलपासून सुरू होणार आहे. या टप्प्यात, ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांना लसीकरण करता येऊ शकते. पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य सेवा आणि आघाडीच्या कामगारांना लसीकरण करण्यात आले होते.



हेही वाचा

केंद्राचा मोठा निर्णय, ४५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या सगळ्यांना कोरोना लस

दादर, धारावी, माहीममध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा