Advertisement

मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ५२३ दिवसांवर

मुंबईत रोज कोरोनाच्या सरासरी १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यापैकी ५ टक्क्यांपेक्षाही कमी अहवाल बाधित येत आहेत.

मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ५२३ दिवसांवर
SHARES

दिवसेंदिवस मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर आता ०.१३ टक्क्यांवर आला आहे. तसंच रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल ५२३ दिवसांवर पोहोचला आहे. 

मुंबईत बुधवारी दिवसभरात ४३४ नवीन रुग्ण आढळले. तर ६ जणांचा मृत्यू झाला. बुधवारी दिवसभरात ४९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. येथील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३,०७,१६९ वर गेली आहे. तर ११ हजार ३१९ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २ लाख ८९ हजारांहून अधिक म्हणजेच ९४ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत सध्या ५६४४ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी दोन हजार रुग्णांना लक्षणे आहेत. ३०० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

मुंबईत रोज कोरोनाच्या सरासरी १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यापैकी ५ टक्क्यांपेक्षाही कमी अहवाल बाधित येत आहेत. आतापर्यंत २७ लाख ४२ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण चाचण्यांपैकी बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण १२ टक्क्यांचा खाली आलं आहे. 

कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरलेल्या धारावीतील कोरोना पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं चित्र आहे.  धारावीमध्ये तिसऱ्यांदा शून्य रुग्णाची नोंद झाली आहे. दादर आणि धारावीत बुधवारी एकही नवीन रुग्ण आढळला नाही. दादरमध्ये सध्या ८४, तर धारावीत १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.



हेही वाचा -

सामान्यांना पालिका मुख्यालयाची इमारत आतून पाहण्याची संधी

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलवाहिन्यांना 'या' भागात धोका


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा