Advertisement

जे.जे रुग्णालयातील मार्डच्या डॉक्टरांचं आंदोलन


जे.जे रुग्णालयातील मार्डच्या डॉक्टरांचं आंदोलन
SHARES

भायखळ्यातील सर.जे.जे. समूह रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी सोमवारी सुरक्षेच्या प्रश्नासंदर्भात आंदोलन केलं. सरकारने नेमलेले सुरक्षारक्षक रुग्णालयात दिसत नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं त्याचं म्हणणं आहे.

नातेवाईकांकडून होणाऱ्या मारहाणीपासून डाॅक्टरांचा बचाव करण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील सरकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयात तीन महिन्यांपूर्वी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली. पण, आता परिस्थिती 'जैसे थे'च आहे. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर सुरक्षा रक्षकांची सेवा द्यावी, अशी मागणी या निवासी डॉक्टरांनी केली आहे.


गेल्या दीड महिन्यांपासून रुग्णालयात सुरक्षारक्षक नाहीत. सरकारने सुरक्षारक्षक काढले असतील तर त्यांनी आम्हाला पर्यायी सुरक्षा व्यवस्था दिली पाहिजे. नागपूरला घडलेल्या घटनेनंतर मुंबईतील रुग्णालयात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही हे आंदोलन केलं. 

- डॉ. सारंग डोनारकर, मार्ड अध्यक्ष, सर.जे.जे.समूह रुग्णालय


सुरक्षा रक्षकांना पगार नसल्याने त्यांना हटवण्यात आल्याचं म्हटलं जात आहेत. पण हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी आम्हाला योग्य सुरक्षा पुरवलीच पाहिजे, असं मतही डॉ. डोनारकर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना व्यक्त केलं. शिवाय, आम्हाला राहण्यासाठी चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत, असंही ते म्हणाले. 



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा