संपकरी डॉक्टरांना उच्च न्यायालयाने फटकारले

 Mumbai
संपकरी डॉक्टरांना उच्च न्यायालयाने फटकारले
Mumbai  -  

मुंबई - सामूहिक रजेवर गेलेल्या डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. निवासी डॉक्टरांना तात्काळ सेवेत रुजू होण्यास सांगा, असे कोर्टाने मार्डला बजावले असून अन्यथा तो कोर्टाचा अवमान असेल, असा सज्जड दमच कोर्टाने मार्डला भरला आहे.

या वेळी कोर्टाने "आम्ही परत संपावर जाणार नाही" या मार्डच्या प्रतिज्ञापत्राची देखील कोर्टा आठवण करून दिली आहे. सामूहिक रजेवर गेलेले निवासी डॉक्टर तात्काळ कामावर रुजू न झाल्यास हॉस्पिटल प्रशासनालाही कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या वेळी डॉक्टरांना सुरक्षा देण्यासाठी हॉस्पिटलची सुरक्षा वाढवण्याचे आदेश कोर्टाने पालिका तसेच सरकारला दिले आहेत.

रविवारी संध्याकाळी मुंबईच्या सायन रुग्णालयात डॉक्टर रोहित कुमार यांना रुग्णाच्या मृत्यूनंतर मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीविरोधात निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. डॉक्टरांच्या या कामबंद आंदोलनाचा फटका मात्र रुग्णांना बसला आहे.

Loading Comments