Advertisement

मुंबईला ओमायक्रॉन'पासून सुरक्षित ठेवण्यासाठी मध्यरात्री १ वाजता महापौर विमानतळावर

मुंबईसह जगभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट 'ओमायक्रॉन'मुळं खळबळ उडाली आहे. सर्वत्र भीतिचं वातावरण निर्माण झालं आहे.

मुंबईला ओमायक्रॉन'पासून सुरक्षित ठेवण्यासाठी मध्यरात्री १ वाजता महापौर विमानतळावर
SHARES

मुंबईसह जगभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट 'ओमायक्रॉन'मुळं खळबळ उडाली आहे. सर्वत्र भीतिचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच मुंबईला 'ओमेक्रॉन'च्या धोक्यापासून लांब ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन सर्व प्रयत्न करत आहेत. त्यातच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुरक्षेच्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची तपासणी केली.

कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूसंदर्भात पूर्वतयारीच्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व उपमहापौर अॅड. सुहास वाडकर यांनी मध्यरात्री १ वाजता अंधेरी (पूर्व) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कशा पद्धतीनं तपासणी करण्यात येते, याची पाहणी करून काही निर्देश दिले.

मार्च २०१९ मध्ये मुंबईत प्रथम कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर महापौर व उपमहापौरांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट दिली होती. कोरोना विषाणूचा अत्यंत वेगानं पसरणारा नवीन प्रकार काही आफ्रिकन देशांमध्ये आढळला असून त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने सर्वांना धोक्याचा इशारा दिलेला आहे.

हे लक्षात घेता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनानं आपापल्या स्तरावर आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी, तसंच ज्या आफ्रिकन देशांमध्ये नवीन कोविड विषाणू आढळला आहे. तेथून थेट किंवा अन्य हवाई मार्गानं आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबईत आला तर, त्यांचे पारपत्र (पासपोर्ट) काटेकोरपणे तपासावे, अशा विविध सूचना महापौरांनी यावेळी विमानतळ प्रशासनाला दिल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा