Advertisement

दहिसर, मुलुंडमध्ये 2 हजार खाटांचं कोविड सेंटर

मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना खाटा उपलब्ध होण्यासाठी मुंबई महापालिकेने दोन हजारहून अधिक खाटांचे कोविड सेंटर उभारलं आहे.

दहिसर, मुलुंडमध्ये 2 हजार खाटांचं कोविड सेंटर
SHARES
मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना खाटा उपलब्ध होण्यासाठी मुंबई महापालिकेने दोन हजारहून अधिक खाटांचे कोविड सेंटर उभारलं आहे. दहिसर येथे १ हजार ६५ आणि मुलुंड येथे १ हजार ९१५ खाटांचे हे सेंटर असणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या दोन्ही कोविड सेंटरची नुकतीच पाहणी केली.


दहिसर पूर्व येथे मुंबई मेट्रोच्या पुढाकाराने ९५५ खाटांचे; तर दहिसर पश्चिमेकडे कांधरपाड्याजवळ ११० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येत आहे. तर मुलुंड परिसरात लालबहादूर शास्त्री मार्गालगत १ हजार ९१५ खाटांचे उपचार केंद्र सिडकोच्या पुढाकाराने उभारण्यात येत आहे. तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात येत असलेली ही तिन्ही उपचार केंद्रे या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होतील.

 दहिसर पूर्व येथे असणाऱ्या कोविड सेंटरमधील ९५५ खाटांपैकी ६४० खाटांना प्राणवायू सुविधा उपलब्ध असणार आहे. दहिसर पश्चिमेमधील कांधरपाडा परिसरातील कोविड सेंटरममधील ११० खाटांपैकी ७७ खाटा ह्या हाय डिपेंडन्सी युनिट'अंतर्गत असणार आहेत. तर ३३ खाटा या अतिदक्षता कक्षाचा  भाग असणार आहेत. तर उर्वरित १० खाटा या कोविड बाधित रुग्णांच्या डायलिसिस करिता राखीव असणार असून त्यांचा गरजेनुसार वापर केला जाणार आहे.


मुलुंड परिसरातील लालबहादूर शास्त्री मार्गालगत असणाऱ्या संशोधन समूहाच्या जागेत १ हजार ९१५ खाटांचे तात्पुरत्या स्वरुपातील परंतु मजबूत बांधणी असणारे उपचार केंद्र उभारण्यात येत आहे. या ठिकाणी सुरुवातीच्या टप्प्यात एकूण खाटांपैकी ५० खाटा या अतिदक्षता कक्षाचा भाग असणार आहेत. त्यानंतर त्या ठिकाणची गरज लक्षात घेऊन अतिदक्षता कक्षाची क्षमता वाढविली जाणार आहे. उर्वरित १ हजार ८६५ खाटांपैकी किमान १ हजार खाटांना प्राणवायू सुविधा असणार आहे.हेही वाचा -

ठाणे जिल्ह्यात 5137 रुग्णांची कोरोनावर मात, जिल्ह्यातील 'अशी' आहे रुग्णांची सद्यस्थिती

महापालिका, डॉक्टर, नर्स यांच्या प्रयत्नांनंतर धारावीतील रुग्णवाढीचा वेग मंदावला


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा