Advertisement

नर्सिंग होम सुरू न केल्यास परवाने रद्द, मुंबई महापालिकेचा इशारा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील खासगी नर्सिंग होम्स बंद आहेत. ही नर्सिंग होम्स सुरू न केल्यास त्यांचे परवाने रद्द करू, अशा इशारा आता मुंबई महापालिकेने दिला आहे.

नर्सिंग होम सुरू न केल्यास परवाने रद्द, मुंबई महापालिकेचा इशारा
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील खासगी नर्सिंग होम्स बंद आहेत. ही नर्सिंग होम्स सुरू न केल्यास त्यांचे परवाने रद्द करू, अशा इशारा आता मुंबई महापालिकेने दिला आहे. तसंच खासगी दवाखाने सुरू न करणाऱ्या डॉक्टरांवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही  महापालिकेने दिली आहे.

मुंबईत कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. मागील दीड महिन्यांपासून महापालिका एकहाती कोरोनाशी सामना करत आहे. पालिकेच्या रुग्णालयातील डाॅक्टर, नर्सेस रात्रंदिवस कोरोनाशी लढा देत आहेत. अशा परिस्थितीत मुंबईतील नर्सिंग होम्सच्या मालकांनी आपली रुग्णालये बंद ठेवली आहेत. अशा नर्सिंग होम्सच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला दिले आहेत. 

मुंबईतील छोटी-मोठी नर्सिंग होम्स बंद असल्याचा मोठा फटका कोरोना व्यतिरिक्तच्या अन्य रुग्णांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. मुंबईत जवळपास १७ हजार छोटी व मोठी नर्सिंग होम्स असून याचा मोठा आधार स्थानिक पातळीवर रुग्णांना मिळत असतो. मात्र कोरोना व लॉकडाउनमुळे मुंबईतील बहुतेक नर्सिंग होम्सच्या चालकांनी आपली रुग्णालये बंद ठेवली आहेत. त्यामुळे  पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याला मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी या नर्सिंग होम आणि खासगी दवाखान्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.

सोसायटी आणि चाळीच्या आवारात असलेले नर्सिंग होम किंवा खासगी दवाखाने सुरू करण्यास सोसायटी, चाळीतील रहिवाशी, घरमालक किंवा शेजाऱ्यांनी अडथळा आणल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याचे आदेशही परदेशी यांनी दिले आहेत. मुंबईतील सर्वच्या सर्व नर्सिंग होम आणि खासगी दवाखान्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेशही पालिकेच्या २४ विभागातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.



हेही वाचा -

क्वॉरन्टाईन सेंटरसाठी मुंबई महापालिकेच्या शाळा

मुंबईतील १८९ कंटेन्मेंट झोनमध्ये एकही नवीन रूग्ण नाही




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा