Advertisement

मुंबईत मंगळवारी कोरोनाचे १०१२ नवीन रुग्ण

मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन १०१२ रुग्ण आढळले. तर २ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईत मंगळवारी कोरोनाचे १०१२ नवीन रुग्ण
SHARES

मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन १०१२ रुग्ण आढळले. तर २ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. १०५१ जणांनी कोरोनावर मात केली. 

मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता ३,३५,५८४ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ११,५०६ झाला आहे. आतापर्यंत ३,१२,४५८ जण बरे झाले आहेत. मुंबईत सध्या १०,७३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात मागील २४ तासांत १७,९२१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून १३३ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता १,१२,६२,७०७ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा १,५८,०६३ इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात २०,६५२ जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत १,०९,२०,०४६ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या १,८४,५९८ जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

मंगळवारी राज्यात ९९२७ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर १२,१८२ रूग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ८९ हजार २९४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.३४ टक्के झालं आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या  ९५ हजार ३२२ आहे.  सर्वाधिक १८ हजार १३७ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात  ११ हजार ८११ रुग्णावर उपचार सुरू असून ठाणे जिल्ह्यात १० हजार ३३७ तर मुंबईत  ९ हजार ३३० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा