Advertisement

तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज; 'अशी' आहे तयारी

राज्यातील तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तब्बल पाच ठिकाणी नवे कोव्हिड सेंटर उभारण्यात येणार आहे.

तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज; 'अशी' आहे तयारी
SHARES

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तब्बल पाच ठिकाणी नवे कोव्हिड सेंटर उभारण्यात येणार आहे. यात ७० टक्के बेड हे ऑक्सिजनयुक्त असणार आहेत.

५ ठिकाणी नवे कोव्हिड सेंटर

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबईची सज्जता पाहायला मिळत आहे. तर तिसऱ्या लाटेसाठी मुंबईत ७ हजार बेडची तयार करण्यात आले आहेत. मुंबईतील मालाड, महालक्ष्मी, सोमय्या ग्राऊंड, नेस्को सेंटर २, कांजूरमार्ग या ५ ठिकाणी नवे कोव्हिड सेंटर उभारण्यात येणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी हे नवे कोरोना सेंटर उभारण्याचा काम सुरु आहे.

७० टक्के बेड ऑक्सिजनयुक्त

मुंबईत उभारण्यात येणारे नवे कोविड सेंटरचे ७० टक्के बेड ऑक्सिजनयुक्त असणार आहे. तर यात काही विशेष पेडियॉट्रीक वॉर्डही असणार आहे. मुंबईतील मालाड येथील कोविड सेंटर येत्या ८ दिवसांत सुरु केले जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे

लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड

मुंबईतील मालाड कोविड सेंटरमध्ये २१७० बेड उपलब्ध आहेत. हे सेंटर तिसऱ्या लाटेसाठी पहिल्या टप्प्यात सुरु करण्यात येणार आहे. यात मालाड, महालक्ष्मी, सोमय्या ग्राऊंड, नेस्को सेंटर २, कांजूरमार्ग या ५ ठिकाणांचा समावेश आहे. यात लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड उपलब्ध करण्यात आला आहे. यात एकूण ७००० बेड उपलब्ध होणार आहेत. मुलासोबत त्यांच्या पालकांना देखील राहण्यासाठी सुविधा उपलब्ध असणार आहे, असेही सुरेश काकाणी यांनी म्हटलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा