Advertisement

मुंबईकरांनो सावध व्हा! पुढच्या ४८ तासांत उसळणार उष्णतेची लाट

पुढील ४८ तासांत मुंबईत उष्णतेची लाट उसळणार असून मुंबईतलं तापमान ३७ अंश सेल्सियसवर जाणार असल्याची माहिती हवामान खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली. दोन दिवसांत उष्णता वाढणार असल्यानं मुंबईकरांनी आणि पर्यटकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहनही हवामान खात्यानं केलं आहे.

मुंबईकरांनो सावध व्हा! पुढच्या ४८ तासांत उसळणार उष्णतेची लाट
SHARES

मुंबईकरांनो अाणि मुंबईत कामानिमित्त येणाऱ्यांनो आणि पर्यटकांनो जरा सावधान... कारण पुढचे दोन दिवस अर्थात ४८ तास मुंबईकराच्या जिवाची काहिली-काहिली होणार अाहे. पुढील ४८ तासांत मुंबईत उष्णतेची लाट उसळणार असून मुंबईतलं तापमान ३७ अंश सेल्सियसवर जाणार असल्याची माहिती हवामान खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली. दोन दिवसांत उष्णता वाढणार असल्यानं मुंबईकरांनी आणि पर्यटकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहनही हवामान खात्यानं केलं आहे.


उकाड्यानं मार्च महिन्याची सुरुवात

मार्च महिना उजाडला की, मुंबईत उकाड्याला सुरूवात होते आणि एप्रिल-मे महिन्यात उष्णतेचा पारा अधिक वाढत जातो. मार्चमध्ये सहसा तापमान ३० ते ३३ अंश सेल्सियस असतं. पण यंदा मार्च महिन्याची सुरुवातच उकाड्यानं होणार आहे. मुंबईत पुढच्या ४८ तासांत उष्णतेची लाट उसळणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढचे दोन दिवस जरा विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. मार्च महिन्यात मुंबईत ३३ अंश सेल्सियसपर्यंत तापमान असतं, ते पुढच्या दोन दिवसांत थेट ३७ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे मुंबईतील उकाडा चांगलाच वाढणार आहे.



ही काळजी घ्या

  • पाणी भरपूर प्या. दिवसाला किमान ३-४ लिटर पाणी प्या.
  • नारळ पाणी, लिंबू पाणी, लस्सी, ताक आदी पेयांचं सेवन करा
  • ताज्या फळांचं सेवन करा
  • घराबाहेर पडताना गाॅगल, छत्री, टोपी आदींचा वापर करा
  • सुती कपड्यांचा वापर करा
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा