कर्कग्रस्तांसाठी ‘माय हेयर फॉर कॅन्सर’ उपक्रम

 Cross Ground
कर्कग्रस्तांसाठी ‘माय हेयर फॉर कॅन्सर’ उपक्रम

चर्चगेट - कर्क रुग्णांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नर्गीस दत्त फाउंडेशनने संयुक्त रित्या ‘माय हेयर फॉर कॅन्सर’ हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. सोमवारी चर्चगेट येथील क्रॉस मैदानात याची सुरुवात करण्यात आली.

डोक्यावरील केस गळण्यामुळे कर्क रुग्णांची स्व-प्रतिमा, सन्मान आणि आत्मविश्वासावर परिणाम होतो. कित्येकदा केसांचे गळणे कर्करोगापेक्षा जास्त त्रासदायक ठरते. ‘या उपक्रमात सामान्यांमध्ये जनजागृती करून त्यांनी आपले केस कचऱ्यात न टाकता त्याची योग्य साठवणूक करून कर्क रुग्णांसाठी दान करावेत यासाठी पुढाकार घेतल्याचं संस्थापक डॉ. अपूर्व शहा यांनी सांगितले. या वेळी नर्गीस दत्त फाउंडेशनच्या विश्वस्त प्रिया दत्त उपस्थित होत्या.

Loading Comments