Advertisement

मुंबईत आढळले ८ ओमिक्रॉन रुग्ण, कोरोना रुग्णांमध्येही वाढ

राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव वाढत असल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे.

मुंबईत आढळले ८ ओमिक्रॉन रुग्ण, कोरोना रुग्णांमध्येही वाढ
SHARES

राज्यात ओमिक्रॉनचा (Omicron) फैलाव वाढत असल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे. सोमवारी ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आला नसल्यानं काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, राज्यात मंगळवारी ११ जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून (Health Department) देण्यात आली आहे.

राज्यातील ओमिक्रॉनबाधितांची एकूण संख्या आता ६५ वर पोहोचली आहे. नाताळ आणि नववर्षाच्या तोंडावर ओमिक्रॉनचा वाढता फैलाव आरोग्य विभागासाठी डोकेदुखी ठरत आहे.

मंगळवारी आढळून आलेल्या ११ ओमिक्रान बाधितांमध्ये ८ जण हे मुंबई विमानतळावरील स्क्रीनिंग दरम्यान आढळून आले. तर, पिंपरी-चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई इथं प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला. आजपर्यंत आढळलेल्या ६५ ओमिक्रॉन बाधितांपैकी ३४ जणांची आरटीपीसआर चाचणी निगेटिव्ह आल्यानं त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात मंगळवारी ८२५ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. १४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ७९२ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आजपर्यंत ६६ लाख ५० हजार ९६५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी ६४ लाख ९८ हजार ८०७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाणे ९७.७१ टक्के असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

टास्क फोर्सने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात फेब्रुवारीमध्ये ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ दिसून येईल. अशावेळी ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी कोरोना नियमांचे पालन हा महत्वाचा उपाय असल्याचंही टास्क फोर्सनं म्हटलंय.



हेही वाचा

नवी मुंबईत 'इथं' आढळला ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण

कोविड मृतांच्या कुटुंबियांना ‘या’ आठवड्यात मिळणार आर्थिक मदत

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा