Advertisement

ठाण्यात ४९० खाटांचं नवं कोरोना रुग्णालय

याआधी बाळकूम येथे एमसीएचआय आणि एमएमआरडीएच्या सहकार्याने १०४३ खाटांचं आणि कळवा येथे म्हाडाच्या मदतीने ११०० खाटांचं कोरोना सेंटर सुरू करण्यात आलं आहे.

ठाण्यात ४९० खाटांचं नवं कोरोना रुग्णालय
SHARES

ठाणे महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची खाटांची कमतरता भासू नये यासाठी पुरेपूर प्रयत्न ठाणे महापालिका करत आहेत. वागळे प्रभाग समिती क्षेत्रातील बुश कंपनीच्या आवारामध्ये ४९० खाटांंची क्षमता असलेलं नवीन कोरोना रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे. या रुग्णालयाचं उद्घाटन सोमवारी राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा उपस्थित होते.

याआधी बाळकूम येथे एमसीएचआय आणि एमएमआरडीएच्या सहकार्याने १०४३ खाटांचं आणि कळवा येथे म्हाडाच्या मदतीने ११०० खाटांचं कोरोना सेंटर सुरू करण्यात आलं आहे. आता बुश कंपनीच्या आवारात ४९० खाटांची क्षमता असलेलं रुग्णालय कार्यान्वित झालं आहे. या रुग्णालयात सध्या ४४० खाटा असून त्यापैकी ३५० खाटा ऑक्सिजन व्यवस्थेने सुसज्ज आहेत. तर उर्वरित ९० साध्या खाटा उपलब्ध आहेत.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम सुरू केली आहे. कोरोना युद्धातील लढाईला बळ देण्यासाठी नवं रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे. कोरोना रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी ह्या वाढीव खाटांची मदत मिळेल.



हेही वाचा -

२ पेक्षा अधिक मजल्यांवर कोरोना रुग्ण आढळल्यास इमारत सील

मुंबईच्या 'या' परिसरात कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा