हॉटेलमध्ये विचारलं जाणार आता किती खाणार ?

 Mumbai
हॉटेलमध्ये विचारलं जाणार आता किती खाणार ?
हॉटेलमध्ये विचारलं जाणार आता किती खाणार ?
हॉटेलमध्ये विचारलं जाणार आता किती खाणार ?
हॉटेलमध्ये विचारलं जाणार आता किती खाणार ?
See all

याआधी तुम्ही हॉटेलात गेलात की काय खाणार, असं विचारलं जायचं पण आता तुम्ही किती खाणार असं तुम्हाला कदाचित विचारलं जाऊ शकतं. अन्नाची होणारी नासाडी थांबवण्यासाठी केंद्र सरकार आता एका थाळीत एक माणूस किती जेवू शकतो यावर लक्ष केंद्रीत करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच ‘मन की बात’ या कार्यक्रमात वाया जाणाऱ्या अन्नाविषयी तीव्र चिंता व्यक्त केली. तसंच पार्ट्या , समारंभात वाया जाणारं अन्न हा गोरगरीबांवर होणारा अन्याय असल्याचं नमूद करण्यात आलंं आहे. याच पार्श्वभूमीवर हॉटेलमध्ये ऑर्डर केलेल्या थाळीत पदार्थांचे प्रमाण किती असावे किंवा पदार्थांची संख्या किती असावी, हे सर्व सरकार ठरवणार आहे. 

जर एखादी व्यक्ती जेवणाच्या थाळीत अनेक पदार्थ मागवत असेल आणि त्यात ते पदार्थ एका व्यक्तीला संपणार नसतील तर ते अन्न वाया जातं. त्यामुळे ही नवी शक्कल लढवणार असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलंय. तसंच एका व्यक्तीच्या थाळीत खाद्यपदार्थांचा नेमका किती ऐवज असेल हे हॉटेलवाल्यांनी स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे, असंही पासवान यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानुसार ग्राहकांना किती खाणं मागवायचे आहे, याचा अंदाज येईल आणि खाणं वाया जाणार नाही, असे सुतोवाच पासवान यांनी केलं आहे. तसंच 

‘जेवण वाया जाऊ नये ही मानसिकता चांगली आहे पण भारतीय मानसिकतेनुसार थाळीतील उरलेलं जेवण घरी घेऊन जाता येतं. त्यासाठी ते अन्न फेकण्याची गरज नाही. त्यामुळे अन्न वाया जाईलच असं नाही. तसंच या विषयी हॉटेल मालकांशी बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यानुसार बैठकीत आम्ही आमचं मत मांडू. ’
आदर्श शेट्टी , अध्यक्ष, आहार

याविषयी हॉटेल व्यावसायिकांची लवकरच बैठक बोलावण्यात येणार असल्याचंही रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलंय.

Loading Comments