Advertisement

पीडित महिलांसाठी सायन रुग्णालयात लवकरच निर्भया केंद्र

काही दिवसांपूर्वी परळ येथील केईएम रुग्णालयात निर्भया केंद्र सुरू झालं आहे. या केंद्रात मानसोपचारतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, न्यायवैद्यक तज्ज्ञ असे विविध शाखेतील तज्ज्ञ एकाच वेळी पीडितांवर उपचार करतात.

पीडित महिलांसाठी सायन रुग्णालयात लवकरच निर्भया केंद्र
SHARES

 घरगुती हिंसा, विनयभंग, लैंगिक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला अशा घटनांमधील पीडित महिलांसाठी सायन रुग्णालयात लवकरच ‘निर्भया केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील वैद्यकीय तज्ज्ञांकडून उपचार करण्यात येतील


रुग्णांची वाढती संख्या

काही दिवसांपूर्वी परळ येथील केईएम रुग्णालयात निर्भया केंद्र सुरू झालं आहे. या केंद्रात मानसोपचारतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, न्यायवैद्यक तज्ज्ञ असे विविध शाखेतील तज्ज्ञ एकाच वेळी  पीडितांवर उपचार करतात. यापूर्वी अशा रुग्णांवर केईएमच्या मानसोपचार विभागात उपचार करण्यात येत असतं. केईएम रुग्णालयाप्रमाणं सायन रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे पीडित येत असतात. केईएम रुग्णालयात दर महिन्याला १०-१५ रुग्ण तर सायन रुग्णालयात ५० रुग्ण येत असतात. त्यामुळं सायन रुग्णालयातही निर्भया केंद्र सुरू करण्यात येणार अाहे.


येत्या काही दिवसात सायन रुग्णालयात निर्भया केंद्र सुरु करण्यात येणार आहे. या केंद्रासाठी सायन रुग्णालय प्रशासनाकडून जागा देण्यात आली असून इतर सर्व प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. या केंद्रामुळं लैंगिक अत्याचार, घरगुती हिंसा, विनयभंग, अॅसिड हल्ल्यातील  पीडितांवर उपचार करणं सोपं होणार आहे.

 - डाॅ. जयश्री मोंडकर, अधीक्षक, सायन रूग्णालय



हेही वाचा - 

विद्यापिठातील सुरक्षा रक्षक वाऱ्यावर; बुक्‍टू संघटना करणार उपोषण

तर मुंबई विद्यापीठाला टाळं ठोका, मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा