देशांमधील कोविड 19 ची वाढती प्रकरणे पाहता आज तज्ञ आणि अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला. कोविड अजून संपलेला नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी संबंधितांना सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
'या' ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला
तुम्ही घरामध्ये किंवा घराबाहेर गर्दीच्या ठिकाणी असाल तर मास्क वापरा. आजारी किंवा वृद्ध लोकांसाठी हे सर्व अधिक महत्वाचे आहे.
बूस्टर डोस आवश्यक
डॉ. व्ही.के. पॉल यांनी सांगितले की, आतापर्यंत केवळ 27-28 टक्के लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे. आम्ही इतरांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचा सल्ला देतो. बूस्टर डोस सर्वांसाठी अनिवार्य आहे.
दरम्यान, सूचनेनुसार राज्य सरकारने (Maharashtra Government) हा निर्णय घेतला आहे. जगभरातील वाढता कोरोना संसर्ग (Coronavirsu Outbreak) पाहता केंद्रांना राज्यांना जीनोम सीक्वेंसिंग करण्याच्या मार्गदर्शन सूचना केल्या होत्या. या सूचना गांभीर्याने घेत राज्य सरकारने नमुन्यांचं जीनोम सीक्वेन्सिंग करण्याचा निर्णय घेतला असून नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. जगभराचं टेन्शन वाढवणाऱ्या कोरोनामुळे भारत सरकारने खबरदारीचे उपाय करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज कोरोना संदर्भात महत्त्वाची बैठक बोलावली होती. यामध्ये देशातील आणि जगातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला गेला.
हेही वाचा