Advertisement

पक्ष्यांपासून माणसांमध्ये ‘बर्ड फ्लू’ झाल्याची नोंद नाही- सुनील केदार

पक्ष्यांपासून माणसांमध्ये बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग झाल्याची नोंद नसल्याचा अहवाल भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने दिला आहे.

पक्ष्यांपासून माणसांमध्ये ‘बर्ड फ्लू’ झाल्याची नोंद नाही- सुनील केदार
SHARES

पक्ष्यांपासून माणसांमध्ये बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग झाल्याची नोंद नसल्याचा अहवाल भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने दिला आहे. २२ फेब्रुवारीपर्यंत भोपाळ इथं पाठविण्यात आलेल्या १७५ रोग नमुन्यांपैकी ७४ नमुने पाॅझिटिव्ह आढळून आल्याचं पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (sunil kedar) यांनी विधानसभेच्या लेखी प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं.

राज्यात मोठ्या प्रमाणात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याबाबत सदस्य मंगेश कुडाळकर, संजय पोतनीस, सुनील भुसारा, यामिनी जाधव यांच्यासह सुमारे ६१ सदस्यांनी लेखी प्रश्न  विचारला होता. त्याच्या लेखी उत्तरात मंत्री सुनील केदार यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या अहवालानुसार राज्यातील २४ जिल्ह्यात कुक्कुट तसंच अन्य पक्षांमध्ये बर्ड फ्लू झाल्याचं निदान करण्यात आलं आहे. विविध पक्षांच्या मर्तुकीमध्ये गिधाडाचा समावेश आढळून आलेला नाही. मृत पावलेल्या पक्षांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. राष्ट्रीय स्तरावरील भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या अंतिम अहवालानुसार रोग प्रादुर्भाव घोषित करण्यात येतो.

हेही वाचा- राज्यातील बर्ड फ्लू पूर्णपणे नियंत्रणात- सुनील केदार

नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्यासह या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सुधारित कृती आरखड्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे, असं सुनील केदार यांनी सांगितलं.

अफवा टाळा

अफवा व गैरसमजुतीमुळे कोंबड्यांचं मांस आणि अंडी खाणं नागरिकांनी बंद किंवा कमी करू नये कोंबड्यांचं मांस व अंडी हा प्रथिनांचा स्वस्त असणारा स्त्रोत आहे.  पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेलं कोंबड्यांचं मांस आणि उकडलेली अंडी खाणं सुरक्षित आहे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरविण्यात येऊ नयेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

(no bird flu infection in human says maharashtra animal husbandry minister sunil kedar)

हेही वाचा- वाढत्या कोरोनामुळं पुन्हा 'धारावी पॅटर्न' सुरू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा