Advertisement

धारावीतून मोठा दिलासा, शुक्रवारी कोरोनाचा एकही रुग्ण नाही

मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव झाल्यानंतर धारावी हा कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरला होता. त्यानंतर पालिकेचे प्रयत्न, स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून धारावीने कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे.

धारावीतून मोठा दिलासा, शुक्रवारी कोरोनाचा एकही रुग्ण नाही
SHARES

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीने मोठा दिलासा दिला आहे. शुक्रवारी धारावीत कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडला नाही. आता धारावीत केवळ १० अॅक्टिव्ह रुग्ण उरले आहेत.

मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव झाल्यानंतर धारावी हा कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरला होता. त्यानंतर पालिकेचे प्रयत्न, स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून धारावीने कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या धारावी पॅटर्नचं जगभरात कौतुकही झालं. दिवसेंदिवस येथील रुग्णसंख्या घटू लागली आहे. शुक्रवारी तर धारावीसाठी कोरोनाचा शून्य दिवस ठरला.

 महिना भरात धारावीत एक- दोन अशा संख्येनं रुग्ण आढळत होते. शुक्रवारी तब्बल महिनाभरानंतर धारावीत एकही रुग्ण आढळला नाही. सध्या धारावीत कोरोनाचे १० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. येथील रुग्णांची संख्या ३ हजार ९०४ इतकी आहे. आतापर्यंत ३५८२ रुग्ण बरे झाले आहेत.

माहीम आणि दादर भागातही गेल्या काही दिवसांपासून  रुग्णसंख्येत मोठी घट दिसत आहे. दादरमध्ये शुक्रवारी अवधे २ रुग्ण आढळले. येथील एकूण रुग्णांची संख्या ४९०० झाली आहे. तर ४ हजार ६४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दादारमध्ये आता ८२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. माहिममध्ये शुक्रवारी ३ रुग्ण सापडले. माहीमध्ये आता १०१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.हेही वाचा -

मध्य रेल्वे सुरू करणार 'डिजीलॉकर' सुविधा

लसीकरणानंतर मद्यपान न करण्याचा सल्ला, डॉक्टरांमध्ये संभ्रमRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा