Advertisement

मुलांसाठीच्या कोवॅक्सिन लसीनंतर पेन किलरची गरज नाही - भारत बायोटेक

१५ ते १८ वर्षाच्या मुलांच्या लसीकरणानंतर पेन किलर घेणं किती योग्य याचं उत्तर भारत बायोटेकनं दिलं आहे.

मुलांसाठीच्या कोवॅक्सिन लसीनंतर पेन किलरची गरज नाही - भारत बायोटेक
SHARES

देशात १५ ते १८ वर्षाच्या मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पण लसीकरणानंतर होणाऱ्या सौम्य साईड इफेक्ट टाळण्यासाठी पॅरासिटेमॉल किंवा पेन किलरच्या गोळ्या घेतल्या जात होत्या. पण भारत बायोटेकनं कोव्हॅक्सिनच्या लसीनंतर पॅरासिटेमॉल किंवा इतर पेन किलरच्या गोळ्या घेऊ नयेत असं एका निवेदनात म्हटलं आहे.

लसीकरणानंतर काही सौम्य साईड इफेक्ट दिसले तरी ते एक दोन दिवसात बरे होतात. त्यासाठी कोणत्याही गोळ्यांची गरज नसल्याचंही भारत बायोटेकनं स्पष्ट केलं आहे.

पॅरासिटेमॉलची इतर काही लशींसाठी शिफारस करण्यात आली होती. मात्र ती कोवॅक्सिनसाठी लागू नाही असंही स्पष्टीकरण भारत बायोटेकनं दिलं आहे. जर डॉक्टरांनी सल्ला दिला तरच गोळ्या घ्या असंही म्हटलं आहे.

भारत बायोटेकच्या वतीनं एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, "काही लसीकरण सेंटरकडून मुलांना देण्यात येणाऱ्या कोवॅक्सिन लसीच्या डोसनंतर ५०० मिलीग्रॅमच्या पॅरासिटेमॉलच्या तीन गोळ्या घेण्याची शिफारस करण्यात येत आहे. कोवॅक्सिनच्या लसीनंतर कोणत्याही पेन किलर किंवा पॅरासिटेमॉलच्या गोळ्यांची शिफारस करण्यात येत नाही. भारत बायोटेकच्या वतीनं एकूण ३० हजार लोकांवर या लसीचा उपयोग करण्यात आला आहे. त्यामधील केवळ १० ते २० टक्के लोकांनाच त्याचे काही कमी तीव्रतेचा दुष्परिणाम झाल्याचं समोर आलं आहे. तेही केवळ एक-दोन दिवसांत बरे झाले आहेत. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कोणत्याही गोळ्या घ्या."

पॅरासिटेमॉलच्या गोळ्यांची शिफारस ही इतर लसीच्या डोससोबत करण्यात आली आहे. कोवॅक्सिनच्या लसीसोबत नाही असंही भारत बायोटेकच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.



हेही वाचा

चिंतादायक, मुंबईत नवे रुग्ण १५ हजारांच्या पार

पहिल्याच दिवशी राज्यात लहान मुलांच्या लसीकरणास चांगला प्रतिसाद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा