Advertisement

चाचणी झालेल्यांतला प्रत्येक चौथा माणूस पॉझिटिव्ह

मुंबईत आज दिवसभरात १५ हजाराच्या वर रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

चाचणी झालेल्यांतला प्रत्येक चौथा माणूस पॉझिटिव्ह
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई आज १५ हजार १६६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

विशेष म्हणजे चाचणी करणाऱ्या प्रत्येक ३ जणांनंतर चौथी व्यक्ती कोरोनाबाधित आढळत आहे. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्ही रेट हा थेट २५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

कोरोनाबाधितांचा हा वाढता आकडा प्रचंड चिंता वाढवणारं आहे. कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी दर हा थेट २५ टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोना चाचणीत प्रत्येकी तीन रुग्णांनंतर चौथ्या रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येतोय. त्यामुळे प्रशासनाचीदेखील चिंता वाढली आहे.

मुंबईत दिवसभरात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी १३ हजार १९५ रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. त्यांना उपचाराचा योग्य सल्ला देऊन होम क्वारंटाईन आणि इतर सल्ल्यानुसार क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

प्रशासन या संकटाला सामोरं जाण्यासाठी सज्ज आहे. पण ही रुग्णवाढ लवकरात लवकर थांबवणं आणि कमी करणं हे प्रशासनापुढे आताच्या घडीतील सर्वात मोठं आव्हान आहे. याशिवाय कोरोनाचा रिकव्हरी रेट हा दोन टक्क्यांनी खाली घसरला आहे.

दरम्यान,  मुंबई महानगरपालिकेन कोरोना लसीच्या पहिल्या डोसचा एक कोटीचा टप्पा ओलांडला आहे. या कामगिरीमध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचा समावेश आहे.

दोन वर्षांपासून जगभरात थैमान घालत असलेल्या करोना विषाणूपासून सुटका मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहेत. दोशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने चांगलाच वेग घेतला आहे. तर मुंबईनो कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा मोठा टप्पा आता गाठला आहे.मुंबईत आजवर कोविड लसीची पहिली आणि दुसरी अशा दोन्ही मात्रा मिळून सुमारे 1 कोटी 81 लाखांपेक्षा अधिक लशी देण्यात आल्या आहेत. एकूण दोन कोटी मात्रांचा टप्पा गाठण्याकडे मुंबईची वेगाने वाटचाल सुरु आहे.

लसीकरणाचा वेग वाढवल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने सातत्याने विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. यामध्ये पहिल्या मात्रेचा विचार करता, ३१ मे २०२१ रोजी २५ लाख, १९ जुलै २०२१ ला ५० लाख, १५ सप्टेंबर २०२१ ला ७५ लाख आणि ५ जानेवारी २०२२ ला दुपार अखेर १ कोटी मात्रा देण्याचा टप्पा गाठला गेला आहे.



हेही वाचा

मुलांसाठीच्या कोवॅक्सिन लसीनंतर पेन किलरची गरज नाही - भारत बायोटेक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा