Advertisement

आता गुडघे प्रत्यारोपणासाठी 'गोल्डन' पर्याय

भारतात अाता गोल्ड प्लेटेड गुडघे बसविता येणे शक्य झाले असून महिलांना फक्त शरीरावरच नव्हे तर शरीराबाहेरही सोने घालण्याची अापली अावड जोपासता येणार अाहे. ज्यांना लोखंड किंवा अन्य धातूंची अॅलर्जी असते, त्यांना अाता गोल्डन नी रिप्लेसमेंट करून घेता येईल.

आता गुडघे प्रत्यारोपणासाठी 'गोल्डन' पर्याय
SHARES

दात किडला की अनेक जण दातामध्ये चांदी किंवा सोन्याचे वेष्टन घालण्याला पसंती देतात. अाता गुडघे प्रत्यारोपण करतानाही सोन्याचा पर्याय उपलब्ध झाला अाहे. त्यामुळे अाता माझे गुडघे सोन्याचे अाहेत, असेही काही जण शस्त्रक्रियेनंतर म्हणू शकतील. भारतात अाता गोल्ड प्लेटेड गुडघे बसविता येणे शक्य झाले असून महिलांना फक्त शरीरावरच नव्हे तर शरीराबाहेरही सोने घालण्याची अापली अावड जोपासता येणार अाहे. ज्यांना लोखंड किंवा अन्य धातूंची अॅलर्जी असते, त्यांना अाता गोल्डन नी रिप्लेसमेंट करून घेता येईल.


नवी मुंबईच्या नलिनी सावंतवर झाली शस्त्रक्रिया

नवी मुंबईतील ५५ वर्षीय शालिनी सावंत यांना लोखंड आणि स्टील यांसारख्या धातूंची अॅलर्जी होती. अंगावर एखादा गोल्ड प्लेटेड खोटा दागिना घातला तरी त्यांच्या त्वचेला अॅलर्जी होऊन त्याचा त्रास व्हायचा. त्यामुळे त्यांची ‘गुडघे प्रत्यारोपणाची’ शल्यचिकित्सा करणं अवघड झालं होतं. अखेर नवी मुंबईतील स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलने ‘गोल्डन गुडघे प्रत्यारोपण’ सर्जरी करून सावंत यांना गुडघेदुखीच्या त्रासापासून सुटका केली आहे.

एखाद्या माणसाला विशिष्ट धातूची, रंगाची किंवा वस्तूची अॅलर्जी असू शकते. ही अॅलर्जी त्या व्यक्तीला कायमस्वरूपी त्रासदायक ठरू शकते. त्यातच रुग्णाला मधुमेह असेल तर अॅलर्जीचा त्रास वाढू शकतो. सावंत यांनाही लोखंड, स्टीलसारख्या धातूची अॅलर्जी होती. वाढत्या वयानुसार त्यांना सांधेदुखी, गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला. अखेर गुडघे प्रत्यारोपण म्हणजेच ‘नी रिप्लेसमेंट’चा सल्ला दिला गेला.
- डॉ. शैलेंद्र पाटील, वोक्हार्ट हॉस्पिटलचे ज्येष्ठ अस्थिशल्यविशारद

मोजक्याच रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध

ही सर्जरी आता भारतात फार मोजक्याच रुग्णालयात उपलब्ध आहे. यामध्ये ‘गुडघे प्रत्यारोपण’च्या पार्टला टिटॅनिअल निओबियम नायट्रेट (पोरेक्स) हे कव्हर लावल्यावर त्याचा रंग गोल्ड प्लेटेडसारखा सोनेरी दिसतो. त्यामुळे याला ‘गोल्डन नी रिप्लेसमेंट’ असं नाव देण्यात आलं आहे. यामुळे रुग्णाला कोणत्याही अॅलर्जीचा त्रास होत नाही. नवी मुंबईत अशाप्रकारची गोल्डन नी रिप्लेसमेंट सर्जरी होण्याची ही पहिलीच वेळ असेल, असा दावा डॉ. शैलेंद्र पाटील यांनी केला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा