Advertisement

ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 10 हजारांच्या वर

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या संख्येत दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी ठाणे जिल्ह्यात 445 नवीन रुग्ण आढळले. तर 18 रुग्णांचा मृत्यू झाला.

ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 10 हजारांच्या वर
SHARES

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या संख्येत दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी ठाणे जिल्ह्यात 445 नवीन रुग्ण आढळले. तर 18 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता 10 हजार 419 झाला असून मृतांची संख्या 342 झाली आहे.

शुक्रवारी ठाणे महापालिका क्षेत्रात 152 कोरोना बाधीतांच्या नोंदीसह पाच जणांच्या मृत्यू झाल्याने बाधितांचा आकडा तीन हजार 795 तर मृतांचा आकडा 113 वर पोहोचला. नवी मुंबई महापालिकेत 86 नव्या रुग्णासह 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधीतांचा आकडा 2 हजार 643 तर मृतांचा 8 वर पोहोचला आहे. कल्याण डोंबिवलीत 5 रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीतांचा आकडा एक हजार 327 इतका झाला.

मीरा-भाईंदरमध्ये 46 रुग्णांच्या नोंदीसह 4 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा 903 तर मृतांचा 48 वर गेला आहे. भिवंडीमध्ये 20 रुग्णांची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांचा आकडा 235 झाला आहे. येथे दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांची संख्या 13 वर गेली आहे. बदलापूरमध्ये सात; तर अंबरनाथमध्ये 17 रुग्णांची नोंद झाली. उल्हानगरमध्ये 40 रुग्णांसह एका मृत्यूची नोंद झाली असून बाधीतांचा आकडा 481 तर मृतांचा 20 झाला.

बदलापूरमध्ये सात रुग्णांची नोंद झाली आहे. येथे बाधितांचा आकडा 273 तर मृतांचा आठ झाला आहे. तर, अंबरनाथमध्ये 17 रुग्णांची नोंद झाली असून बाधितांचा आकडा 304 वर गेला आहे. ठाणे ग्रामीण भागात 25 रुग्णांसह दोन मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 458 तर मृतांचा आकडा 12 झाला आहे.


हेही वाचा -
'असे' आहेत मिरा रोड-भाईंदरमधील कंटेन्मेंट झोन

नवी मुंबईतील कंटेन्मेंट झोनची संख्या 30 वर, 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा