Advertisement

मुंबईत वाढणार डायग्नोस्टिक सेंटर्सची संख्या


मुंबईत वाढणार डायग्नोस्टिक सेंटर्सची संख्या
SHARES

येत्या काळात पॅथॉलॉजी सेंटर्स शोधण्यासाठी मुंबईकरांची होणारी धावपळ संपण्याची चिन्हं आहेत. होय एसआरएल या डायग्नॉस्टिक्स चैनने पॅथॉलॉजी सेंटर्सच्या संख्येत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, येत्या तीन महिन्यांत मुंबईसह उपनगरांमध्येही पॅथॉलॉजी सेंटर्स सुरू करण्यात येतील. त्यामुळे मुंबईकरांना याचा अधिक फायदा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


महत्त्वाच्या ठिकाणी नवी केंद्र

सध्याच्या पॅथॉलॉजी सेंटर्सच्या तुलनेत हे जाळे दुप्पट असणार आहे. त्यानुसार खार पश्चिम, ठाणे पश्चिम, मुलुंड पश्चिम, कांदिवली पश्चिम आणि नवी मुंबई या महत्त्वाच्या ठिकाणी नवी केंद्रे सुरू करण्यात येतील.

नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या ऐसपैस पॅथॉलॉजी सेंटरमध्ये अत्यंत अनुभवी पॅथॉलॉजिस्टच्या देखरेखीखाली ३ हजार ५൦൦ हून अधिक चाचण्या केल्या जाणार आहेत. पॅथॉलॉजी केंद्राच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आल्याने मुंबईतील लाखो रहिवाशांना सेवा देण्याची क्षमता अनेक पटीने वाढली आहे. ही प्रमुख केंद्र सुरू करण्यात आल्याने एसआरएलची २५ पॅथॉलॉजी सेंटर्स मुंबईत असतील.

भारतात क्लिनिकल डायग्नॉस्टिक क्षेत्रामध्ये एसआरएल ही एक चांगली कंपनी आहे. मुंबई शहरातूनच एसआरएलची वाटचाल सुरू झाली आहे. लाखो मुंबईकरांना या पॅथॉलॉजीचा फायदा व्हावा, यासाठी हा नवा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

- अरिंदम हलदर, मुख्य कार्यकारी अधिकारी, एसआरएल डायग्नॉस्टिक्स

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा