Advertisement

दिलासादायक! एप्रिलपासून मुंबईत सीलबंद इमारतींच्या संख्येत ९८% घट

मुंबईतील सीलबंद इमारतींची संख्या गेल्या चार महिन्यांत जवळपास ९८% कमी झाली आहे.

दिलासादायक! एप्रिलपासून मुंबईत सीलबंद इमारतींच्या संख्येत ९८% घट
SHARES

मुंबईतील दुसरी कोविड लाट कमी झाल्याचं बोललं जातंय. नुकतंच आदित्य ठाकरे यांनी मुंबईत एकही कन्टेंमेंट झोन नसल्याचं जाहीर केलं होतं. आता मुंबईतील सीलबंद इमारतींची संख्या गेल्या चार महिन्यांत जवळपास ९८% कमी झाली आहे. या क्षणी संपूर्ण शहरात फक्त २१ इमारती सील केल्या आहेत.

कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ.शशांक जोशी म्हणाले, "मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. सुमारे आठवडाभर शहरभरातील दैनंदिन संख्या ३०० पेक्षा कमी आहे आणि दैनंदिन टोल देखील १०च्या खाली घसरला आहे.

पाच किंवा अधिक रहिवाशांनी कोविड -१९ पॉझिटिव्ह आढळल्यास पालिका एका इमारतीला सील करते. एखाद्या इमारतीत पाचपेक्षा कमी प्रकरणं आढळल्यास, ज्या ठिकाणी रुग्ण राहतो तो मजला सील केला जातो. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सीलबंद मजल्यांची संख्या १० हजार ९८३ वर पोहोचली. परंतु आता ती घटून १ हजार ११६ वर आली आहे.

शनिवारी, मार्च २०२० मध्ये साथीच्या रोगाची सुरूवात झाल्यानंतर प्रथमच, शहरात एकही कन्टेमेंट झोन नव्हता. एप्रिलमध्ये दुसऱ्या लाटेच्या शिखरादरम्यान, शहरात जवळजवळ २ हजार ८०० कन्टेंमेंट झोन होते. या भागांमध्ये आणि बाहेर वाहनांच्या हालचालींना प्रतिबंध करण्यासाठी पालिका गर्दीच्या भागात बॅरिकेड लावते.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी शहराच्या सध्याच्या कोविड ट्रेंडचे विश्लेषण केले आणि आढळलं की, नवीन प्रकरणं प्रामुख्यानं इमारतींमधून उदयास येत आहेत आणि शहराच्या कोणत्याही भागात केसेसचे समूह नाहीत.

जोशी यांनी मात्र सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. "आम्ही नुकतेच अनलॉक करणं सुरू केलं आहे. जर लोक कोविड नियमांचं योग्य पालन करत नाहीत आणि लस घेत नाहीत, तर आम्ही आणखी एक लॉकडाऊन लागू करू शकतो."

दहिसरचे शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर म्हणाले की, दुसऱ्या लाटेत झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला नाही. उदाहरणार्थ, दहिसरचे गणपत पाटील नगर, ६० हजारच्या वर लोकसंख्या असलेल्या सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक, हॉटस्पॉट असताना पहिल्या लाटेच्या तुलनेत खूप कमी रुग्ण नोंदवली गेली. प्रकरणं मे मध्ये वाढली तेव्हा पालिकेनं झोपडपट्टी सील केली. यामुळे दहिसर क्लस्टरमध्ये संक्रमणाचा प्रसार नियंत्रित करण्यात मदत झाली, ”घोसाळकर म्हणाले.

गोरेगावमध्ये, भाजप नगरसेविका श्रीकला पिल्लई, ज्यांच्या प्रभागात भगतसिंग नगर १ आणि २, लक्ष्मी नगर आणि इंदिरा नगर यासारख्या झोपडपट्ट्या आहेत, त्यांनी सांगितलं की पहिली लाट झोपडपट्टीवासीयांवर भारी पडली. घर चालवण्यासाठी त्यांना घराबाहेर कामासाठी पडावं लागलं.

माटुंगा-सायन इथल्या भाजप नगरसेविका नेहल शहा यांनी सांगितलं की, दुसरी लाट येईपर्यंत झोपडपट्टीत राहणाऱ्यांनी प्रतिकारशक्ती विकसित केली होती. शहा म्हणाले, “कदाचित तिसरी लाट पुन्हा येण्याची शक्यता आहे. परंतु झोपडपट्टीतील लोकांनी कमीतकमी लसीचा एक डोस घेतलाय याची खात्री करून सरकार तिसरी लाट रोखू शखते.”



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा