Advertisement

मुंबईतील 'या' ४ विभागात ५० टक्के रुग्ण

मुंबईतील सर्व २४ विभागांतील कोरोना रुग्णांची संख्या ७०० च्या वर गेली आहे.

मुंबईतील 'या' ४ विभागात ५० टक्के रुग्ण
SHARES

मुंबईतील कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी वरळी, भायखळा, ग्रँट रोड आणि वांद्रे पश्चिम या चार विभागात ५० टक्के रुग्ण आढळले आहेत. ३०० हून अधिक रुग्ण या चार विभागात आहेत.

मुंबईतील सर्व २४ विभागांतील कोरोना रुग्णांची संख्या ७०० च्या वर गेली आहे. जी-दक्षिणमधील वरळी, लोअर परळ, महालक्ष्मी, हाजी अली, करी रोड, एलफिन्स्टन रोड, सातरस्ता येथे १८४ हून अधिक रुग्ण आहेत. ७ एप्रिलला या विभागात एका दिवसांत ७८ रुग्णांची नोंद झाली होती. गुरुवारी सकाळी १३३ रुग्ण होते. संध्याकाळी त्यात आणखी ५१ रुग्णांची भर पडली.

वरळी, भायखळा, ग्रँट रोड, वांद्रे या चार विभागांत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या विभागांपाठोपाठ अंधेरी, विलेपार्ले, मालाड, वांद्रे पूर्व येथेही रुग्णांची संख्या वाढत आहे. वरळी कोळीवाड्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने येथील परिसर सील करण्यात आला आहे.  कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने संबंधित भाग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सील करण्यात येत आहेत. या परिसरांचा आकडा वाढत असून, गुरुवारपर्यंत मुंबईतील एकूण ३८१ परिसर सील करण्यात आले. 



हेही वाचा -

Coronavirus Updates: दादरमध्ये कोरोनाचे आणखी ३ नवे रुग्ण

१ ते १० वर्षे वयोगटातील २१ मुलांना करोनाची लागण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा