तुम्हाला कर्करोग आहे? मग हे वाचा...

 Parel
तुम्हाला कर्करोग आहे? मग हे वाचा...

परळ - वाढत्या कर्करोगावर मात करण्यासाठी आणि त्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतातील जिनोमिक्स आधारित संशोधन आणि चिकित्सा करणाऱ्या मेडजिनोम या कंपनीने 'ऑन्कोट्रॅक' हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे.

लिक्विड बायोप्सीच्या तंत्रावर विकसित करण्यात आलेल्या 'ऑन्कोट्रॅक' या वेदनारहित चाचणीमुळे भारतातील डॉक्टरांना कर्करोगाच्या विविध प्रकारांवरील जनुकीय उपचार करणं आणि त्याचा अभ्यास करणंही सहज शक्य होणार असल्याची माहिती मंगळवारी परळ पूर्व येथील आयटिसी ग्रॅण्ड सेंट्रल येथील सभागृहात देण्यात आली.

या वेळी प्रमुख वक्ते म्हणून मेडजिनोमचे सीईओ डॉ. एल. रामप्रसाद, टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे वरिष्ठ कर्करोग तज्ञ डॉ. कुमार प्रभास, डॉ. रमाकांत देशपांडे, मेडजिनोमचे संचालक सॅम संतोष उपस्थित होते.

ब्लड कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, बोन मॅरो कॅन्सर, कोलोन कॅन्सर, लासरिन्क्स कॅन्सर, ल्युकेमिया, लंगस कॅन्सर, ओरल कॅन्सर, ओव्हॅरियन कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, रेक्टल कॅन्सर असे एकूण 100 कॅन्सरचे प्रकार आहेत. त्यावर वेळेत औषधोपचार केल्यास तो बरा होतो. मात्र आजही कॅन्सरने मृत्यू होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे ऑन्कोट्रॅक हे नवं वेदनारहित तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून या उपचार पद्धतीसाठी 25 ते 30 हजार इतका खर्च रुग्णांना येणार असल्याचं या वेळी सांगण्यात आलं.

Loading Comments