Advertisement

"कोरोनाचा १ रुग्ण ४०० जणांना संक्रमित करू शकतो"

कोव्हीड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक म्हणाले की, कोरोनाव्हायरसचा १ रुग्ण ४०० नागरिकांना संक्रमित करू शकतो.

"कोरोनाचा १ रुग्ण ४०० जणांना संक्रमित करू शकतो"
(File Image)
SHARES

गुरुवारी १ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील कोव्हीड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक म्हणाले की, कोरोनाव्हायरसचा १ रुग्ण ४०० नागरिकांना संक्रमित करू शकतो.

पत्रकारांशी बोलताना ओक म्हणाले की, राज्यात कोविड-१९ रूग्णांमध्ये सामान्य सर्दी, सौम्य अंगदुखी आणि थकवा या लक्षणांची नवीन श्रेणी समोर आली आहे.

कोरोनाव्हायरस संसर्ग सामान्यत: श्वसनमार्गानं पसरतो. म्हणूनच, कोरोनाव्हायरसच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी मास्क घालणं, स्वच्छता राखणं आणि सामाजिक अंतर पाळण्याशिवाय पर्याय नाही, असंही ओक म्हणाले.

“सर्दी, सौम्य अंगदुखी आणि थकवा अशी लक्षणं रूग्णांमध्ये उद्भवली आहेत आणि जेव्हा ही लक्षणे दिसतात तेव्हा रुग्ण घाबरून डॉक्टरकडे जाणं टाळतात. सध्याच्या परिस्थितीत अशा कोणत्याही लक्षणांना कोविड -१९ चे इन्फेक्शन म्हणून मानले पाहिजे. त्यानुसार औषधे दिली जावीत, ”असंही ते पुढे म्हणाले.

सर्वांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी केंद्र पुरेसं पाठबळ देत नाही असा आरोपही ओक यांनी केला. जन लसीकरणात काही आव्हानं आहेत. तर, राज्य सरकारला डोर-टू-डोर लसीकरणाची परवानगी हवी आहे. परंतु केंद्राच्या परवानगीशिवाय ते करता येणार नाही.

“काही राज्यांमध्ये डोर-टू-डोर लसीकरण सुरू केल्याचे वृत्त आहे आणि महाराष्ट्रालादेखील तसे करण्यास परवानगी देण्यात यावी. कोरोना आणि त्याचा प्रसार अधिक चांगल्या नियंत्रणासाठी राज्यात जूनपर्यंत जास्तीत जास्त लोकसंख्येला लस देण्यात सक्षम झाली पाहिजे,” असं ते म्हणाले.

असं आढळून आलं आहे की, सर्दी आणि सौम्य अंगदुखी त्रास असणाऱ्या लोकांपैकी कोविड -१९ केंद्रांवर खूप उशीर झालेला आहे. प्रवेशाच्या तारखेपासून काही दिवसांतच या आजाराला बळी पडतात, असं ते म्हणाले.



हेही वाचा

‘फ्लिपकार्ट’ने सरकारला दिले ‘इतके’ व्हेंटिलेटर्स गिफ्ट!

लॉकडाऊनमुळं परराज्यातील कामगारांची गावी परतण्यासाठी घाई

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा