Advertisement

‘फ्लिपकार्ट’ने सरकारला दिले ‘इतके’ व्हेंटिलेटर्स गिफ्ट!

कोरोनाच्या विषाणूच्या उद्रेकामुळे राज्यातील आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असताना नामांकीत शाॅपिंग वेब पोर्टल ‘फ्लिपकार्ट’ आणि गिव्ह इंडिया टीमने राज्याच्या आरोग्य विभागाला २८ व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले आहेत.

‘फ्लिपकार्ट’ने सरकारला दिले ‘इतके’ व्हेंटिलेटर्स गिफ्ट!
SHARES

कोरोनाच्या विषाणूच्या (coronavirus) उद्रेकामुळे राज्यातील आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असताना नामांकीत शाॅपिंग वेब पोर्टल ‘फ्लिपकार्ट’ आणि गिव्ह इंडिया टीमने राज्याच्या आरोग्य विभागाला २८ व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले आहेत.  

व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी  फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती, रजनीशकुमार यांचे आभार मानले. या व्हेंटिलेटर्सची तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना नक्कीच मदत होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

यासंबंधीचे आभार पत्र  मुख्यमंत्र्यांनी डिप्पी वांकाणी, संचालक फ्लिपकार्ट यांना दिलं. त्यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास आदी. उपस्थित होते.

हेही वाचा- लोकांनी मानसिकता ठेवावी, कडक निर्बंधांबाबत राजेश टोपेंचं वक्तव्य

दरम्यान, कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या अशीच राहणार असेल आणि लोकं बेफिकिरीने वागणार असतील, तर निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय आपल्याला घ्यावाच लागेल. लाॅकडाऊन जर टाळायचं असेल तर नियम पाळा आणि लाॅकडाऊन टाळा, असंच मला या निमित्ताने सांगायचं आहे, असा सल्ला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिला.

राज्यात कोरोनाचे बेड्स सर्वत्र उपलब्ध आहेत. काही विशिष्ट रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्याची माहिती मिळाल्यानंतर बेड्स वाढविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसंच ऑक्सिजनचा वापर ८०% आरोग्यासाठी व २०% उद्योगासाठी करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन करायचं की निर्बंध अधिक कडक करायचे, यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. या बैठकीनंतर ते रात्री जनतेला संबंधणार आहेत.  

(flipkart and give india team donates ventilators to maharashtra health department)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा