दादर स्टेशनवर लोकलच्या लेडीज डब्यात महिलेची प्रसुती


SHARE

मुंबईतील मध्य रेल्वेवरील दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वर सोमवारी रात्री 10.15 च्या सुमारास एका महिलेची सूखरुप प्रसूती झाली. सलमा शेख 26 असं या महिलेचं नाव असून तिनं एका मुलीला जन्म दिला आहे. ही प्रसूती वन रुपी क्लिनिकच्या डॉक्टरांनी केली असल्याचा दावा वन रुपी क्लिनिककडून करण्यात आला आहे.

वन रुपी क्लिनिकचे ऑन ड्यूटी डॉक्टर प्रज्वलित, जीआरपी रेल्वे पोलीस यांच्या सहाय्याने ही प्रसूती सुखरुप झाल्याचं वन रुपी क्लिनिकचे प्रमुख डॉ. राहुल घुले यांनी सांगितलं.


ती महिला प्रसूतीसाठी केईएम रुग्णालयातच जात होती. पण, मध्येच तिला प्रसूतीकळा आल्या. लेडीज डब्यातच तिची प्रसूती करण्यात आली. बाळाचं तोंड बाहेर आलं होतं. त्यानंतर पुढची सर्व प्रक्रिया वन रुपी क्लिनिकच्या डॉक्टरांनी केली.

- डॉ.राहुल घुले, प्रमुख, वन रुपी क्लिनिक


 आता या महिलेला केईएम रुग्णालयात पाठवण्यात आल्याचं डॉ. राहुल घुले यांनी स्पष्ट केलं आहे. आधीही अशी घटना घाटकोपर स्टेशनवर झाली होती. तेव्हाही आम्हीच त्या महिलेची सुखरुप प्रसूती केल्याचा दावा वन रुपी क्लिनिककडून करण्यात आला होता.


हेही वाचा - 

घाटकोपर स्थानकावर महिलेची प्रसुती, 'वन रुपी क्लिनिक'मध्ये त्वरीत उपचार


संबंधित विषय