Advertisement

मुंबईत गोवरमुळे बालकाचा मृत्यू, कस्तुरबा रुग्णालयात सुरू होते उपचार

उपचारासाठी बालकाला शुक्रवारी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मुंबईत गोवरमुळे बालकाचा मृत्यू, कस्तुरबा रुग्णालयात सुरू होते उपचार
SHARES

कस्तुरबा रुग्णालयातील गोवरवर उपचार घेत असलेल्या एक वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. या बालकाची प्रकृती चिंताजनक होती. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बालकाचा मृत्यू झाला आहे. 

एक वर्षाच्या बाळाला फुफ्फुसाचा गंभीर संसर्ग झाला होता. उपचारासाठी बालकाला शुक्रवारी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्यानं शनिवारी दुपारी बालकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, काल सोमवारी दुपारी 3 वाजता त्याची प्राणज्योत मालवली. कस्तुरबा रुग्णालयात 6 जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे. एकूण 61 रुग्णांवर वॉर्ड आणि अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

मागील दोन महिन्यात मुंबईत गोवरचे 80 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. महापालिकेकडून गोवरचा उद्रेक झालेल्या विभागात विविध उपाययोजनेला सुरुवात करण्यात आली आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जात गोवर संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.  संशयित रुग्णांना जीवनसत्व अ दिले जात आहे. आवश्यकता भासल्यास संशयित रुग्णांना पालिका रुग्णालयात उपचारासाठी पाठवले जात आहे. मुंबई महापालिका रुग्णालयात गोवर बाधित बालकांवर उपचार केले जात आहेत. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा