Advertisement

दिलासादायक! मुंबईत ओमिक्रॉनचे नवे रुग्ण नाहीत

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे.

दिलासादायक! मुंबईत ओमिक्रॉनचे नवे रुग्ण नाहीत
(Representational Image)
SHARES

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) गुरुवार, ९ डिसेंबर रोजी माहिती दिली की, जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलेल्या २११ पैकी केवळ दोन नमुने COVID-19, Omicron या नवीन प्रकारासाठी पॉझिटिव्ह आले आहेत.

प्रशासकिय संस्थेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, डेल्टा प्रकारासाठी २४ चाचणी पॉझिटिव्ह, १९५ डेल्टा डेरिव्हेटिव्ह आणि २ नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन आढळले.

ओमिक्रॉनच्या या दोन रूग्णांचा नवीन प्रकाराच्या गणनेत आधीच समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील या विभागात कोणतीही वाढ झालेली नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पालिकेनं नमूद केलं आहे की, जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलेल्या नमुन्यांची ही पाचवी बॅच होती. ज्या रुग्णांकडून नमुने गोळा केले गेले त्यापैकी एकही मरण पावला नाही.

अधिकाऱ्यांनी नमूद केलं की, पाचव्या बॅचमध्ये २२७ नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी २२१ मुंबईतील होते. यामध्ये १९ (९ टक्के) २० वर्षे वयोगटातील, ६९ (३१ टक्के) २१ ते ४० वयोगटातील, ७३ (३३ टक्के) ४१-६० वयोगटातील, ५४ (२५ टक्के) ) ६१ आणि ८० वर्षांच्या दरम्यान, आणि ८० च्या वर ६ रुग्ण आहेत.

शिवाय, आरोग्य स्थितीचा तपशील देताना पालिकेनं सांगितलं की, कोविड-19 लसीचा पहिला डोस घेतलेल्या एकाला आणि इतर २६ जणांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आलं होतं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लसीकरण न झालेल्या ४७ पैकी १२ रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं.हेही वाचा

ठाण्यात कोविड-१९साठी प्रतिजन, RTPCR चाचण्या वाढणार

आंतरराष्ट्रीय विमान सेवेचं टेक ऑफ लांबणीवर, 'या' दिवसापर्यंत स्थगिती

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा