Advertisement

ठाण्यात कोविड-१९साठीच्या प्रतिजन, RTPCR चाचण्या वाढवणार

ठाणे महानगरपालिकेनं (TMC) शहरात प्रतिजन आणि RT-PCR चाचणीची संख्या वाढवण्याची योजना आखली आहे.

ठाण्यात कोविड-१९साठीच्या प्रतिजन, RTPCR चाचण्या वाढवणार
SHARES

ठाणे महानगरपालिकेनं (TMC) शहरात प्रतिजन आणि RT-PCR चाचणीची संख्या वाढवण्याची योजना आखली आहे. ओमिक्रॉनच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ठाणे महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी आरोग्य विभाग आणि टास्क फोर्ससोबत विशेष बैठक घेतली.

बैठकित असं ठरलं की, चिंताग्रस्त देशांतील प्रवाशांची दैनंदिन माहिती घेतली जाईल आणि त्यानुसार सर्व तरतुदी आणि वैद्यकीय सुविधा सुलभ ठेवल्या जातील.

शिवाय, ठाणे महानगरपालिका परिवहन (TMT) बसमधून प्रवास करणाऱ्यांचं संपूर्ण लसीकरण झालं आहे याची खात्री करण्यासाठी शहरातील प्रमुख बसस्थानकांवर चाचणी लागू केली जाईल.

बसनं प्रवास करणाऱ्यांचे लसीकरण प्रमाणपत्र तपासण्यासाठी सॅटिस, लोकमान्य नगर, वागळे इस्टेट आणि कळवा आगारात विशेष यंत्रणा उभारण्यात येणार आहे. हे सर्वाधिक वारंवार वापरातील किंवा व्यस्त मार्ग असल्यानं आणि शहरातील बसेसचा मुख्य थांबा असल्यानं TMC द्वारे थांब्यावर नियमित तपासणी सुरू केली आहे.

“सर्व कोविड प्रोटोकॉलची काटेकोरपणे अंमलबजावणी करणं आवश्यक आहे आणि त्याशिवाय शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये काम करणाऱ्या सर्वांचे लसीकरण केलं पाहिजे. सर्व सहाय्यक आयुक्तांनी वॉर्डस्तरीय बैठक घ्यावी आणि मास्क नसलेल्यांकडून दंड आकारला जाईल. बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्यानं परिवहन विभागानं याची खात्री करावी की ज्यांना पूर्ण लसीकरण झालं आहे त्यांनाच बसमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे,” शर्मा म्हणाले.

पार्किंग प्लाझा कोविड सुविधेत रुग्णवाहिकेसह औषधे, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सुविधा आणि इतर वैद्यकीय गरजांची तरतूद करण्याच्या सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

प्रवाशांना दररोज फोन करून त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. “वेळेवर आरटी-पीसीआर चाचण्या घेणं आवश्यक आहे आणि आवश्यक असल्यास प्रवाशांना विलगीकरणात ठेवणं आवश्यक आहे. दरम्यान, त्यांचे उच्च-जोखीम संपर्क देखील शोधले पाहिजेत आणि त्यांचे परीक्षण केले पाहिजे, ”शर्मा म्हणाले.हेही वाचा

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग २ महिन्यांत खुला होणार

ऐकावे ते नवलंच! मेंदू हॅक होत असल्याची तक्रार, सायबर पोलिसही चक्रावले

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा