Advertisement

आंतरराष्ट्रीय विमान सेवेचं टेक ऑफ लांबणीवर, 'या' दिवसापर्यंत स्थगिती

आधी १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आंतरराष्ट्रीय विमान सेवेचं टेक ऑफ लांबणीवर, 'या' दिवसापर्यंत स्थगिती
SHARES

ऑमिक्रॉनचा धोका ओळखून भारतानं आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी ३१ जानेवारीपर्यंत कायम ठेवली आहे. कारण सुरूवातील दक्षिण आफ्रिकेत आढलेला ओमिक्रॉन बघता बघता भारतात पोहोचला.

दक्षिण आक्रिकेतून डोंबिलित आलेला तरूणही ओमिक्रॉनबाधित निघाला. त्यामुळे राज्य सरकारनं आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंद घालण्याची मागणी केली होती.

आधी १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ओमिक्रॉनचा वाढता प्रसार पाहता हा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.

प्रवासी विमानसेवेसाठी केंद्र सरकारनं काढलेला हा नवा आदेश लागू असला तरी कार्गो सेवा मात्र पूर्ववत सुरू राहणार आहेत. त्याचप्रमाणं काही खास विमानफेऱ्यांना परवानगी देण्यात येऊ शकते, असं या आदेशात म्हटलं आहे.

मात्र त्यासाठी DGCA ची विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. ज्या विमानांच्या फेऱ्यांचं अगोदरच बुकिंग झालं आहे, त्यांना विशिष्ट अटीवर प्रवासाची परवानगी दिली जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

अलिकडेच समोर आलेल्या संशोधनातून काही नवी माहिती समोर आली आहे. ओमिक्रॉनचा प्रसार हा डेल्टापेक्षाही अधिक वेगानं होतो आहे. त्यामुळे केंद्र सरकारही पुन्हा अलर्ट मोडवर आले आहे. आदित्य ठाकरे यांनी कोरोना योद्ध्यांना बुस्टर डोस द्यावा, म्हणजेच तिसरा डोस लसीचा द्यावा अशीही मागणी केली आहे.

आतापर्यंत ओमिक्रॉनचे २३ रुग्ण भारतात आढळून आले आहेत. ज्यात कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्लीसह ५ राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे या राज्यांच्या चिंतेत आता भर पडली आहे. देशातील अनेक विमानतळावर आरटीपीसीआर टेस्टची व्यवस्था करण्यात आली आहे.

तसंच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना विलगीकरणातही ठेवलं जात आहे. ओमिक्रॉनला रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.



हेही वाचा

परदेशातून येणाऱ्यांसाठी मुंबई विमानतळावर वेगळा कॉरिडॉर

रिक्षा प्रवासही महागला, कल्याण डोंबिवलीत ‘इतकी’ दरवाढ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा