Advertisement

मुंबईत बुधवारी कोरोनाचे ११२१ नवे रुग्ण

मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ३,२८,७४० झाली आहे. मृतांची एकूण संख्या ११,४८२ वर गेली आहे.

मुंबईत बुधवारी कोरोनाचे ११२१ नवे रुग्ण
SHARES

मुंबईत बुधवारी कोरोनाचे ११२१ नवीन रुग्ण आढळले. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला. एका दिवसांत याशिवाय मुंबईत ७३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ३,०६,३७३ म्हणजेच ९३ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. 

मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ३,२८,७४० झाली आहे. मृतांची एकूण संख्या ११,४८२ वर गेली आहे. मुंबईत १०,०१० रुग्ण उपचाराधीन आहेत. आतापर्यंत ३३ लाख ३१ हजाराहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा दर आणखी वाढून ०.२९ टक्के  झाला असून रुग्ण दुपटीचा कालावधीही २३५ दिवसांपर्यंत खाली गेला आहे.

बुधवारी ठाणे २४१, कल्याण-डोंबिवली २४६, नवी मुंबई १५९ , नाशिक ५९३, जळगाव ४३५, पुणे शहर ८५७, पिंपरी-चिंचवड ४६१, उर्वरित पुणे जिल्हा ३७८, सातारा १२९, औरंगाबाद ४४९, अकोला २३४, अमरावती ४८३, नागपूर ९२४ नवे रुग्ण आढळले. राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या ८२,३४३ एवढी झाली आहे. 

बुधवारी राज्यात कोरोनाचे नवीन ९८५५ रुग्ण आढळले. तसंच ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४० टक्के एवढा आहे. बुधवारी ६५५९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत २० लाख ४३ हजार ३४९  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.७७ टक्के आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा