Advertisement

महाराष्ट्रात ऑक्सिजन वाया जाऊ नये म्हणून नेमल्या जाणार नर्स

गेल्यावर्षी नंदुरबार इथल्या एका रुग्णालयात अशी सोय केली गेली होती आणि त्याचा फार मोठा उपयोग झाला होता.

SHARES

महाराष्ट्रातील सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन (Oxygen) नर्सची नियुक्ती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. रुग्णांना बेड मिळण्यात अडचणी येत आहेतच पण ऑक्सिजनची कमतरता फार मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यामुळे उपलब्ध ऑक्सिजन वाया जाऊ न देणे यासाठी ही व्यवस्था केली जात आहे.

गेल्यावर्षी नंदुरबार इथल्या एका रुग्णालयात अशी सोय केली गेली होती आणि त्याचा फार मोठा उपयोग झाला होता. या वर्षीही या रुग्णालयानं ऑक्सिजन नर्स नेमल्या आहेत. त्यामुळे लवकरच हा प्रयोग राज्यभर केला जाणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

या नर्स दर दोन ते चार तासांनी रुग्णाला ऑक्सिजनची किती गरज आहे? हे चेक करतील आणि त्यानुसार ऑक्सिजनचे प्रमाण कमी जास्त करतील. ५० रुग्णांसाठी एक नर्स असेल.

आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, ऑक्सिजनचा विचारपूर्वक वापर करण्यावर भर देणं आवश्यक आहे. ऑक्सिजन वाया जाणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. अनेकदा पेशंट वॉशरूम मध्ये गेला असेल, जेवत असेल, फोनवर बोलत असेल तर तोंडावरचा ऑक्सिजन मास्क काढून ठेवतो पण त्यावेळी ऑक्सिजन पुरवठा सुरूच असल्यानं तो वाया जातो. पेशंटच्या रक्तातील ऑक्सिजन पातळी सुधारली असेल तरी फ्लो कमी केला जात नाही. ही सर्व काळजी ऑक्सिजन नर्स घेतील.



हेही वाचा

सीरम इन्स्टिट्यूटनं कोविशिल्डचे दर कमी केले, आता इतक्या किंमतीत लस मिळणार

महाराष्ट्रात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू होणार नाही!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा