Advertisement

ऑक्सिजन सिलिंडर हवा? 'या' ५ संस्था मोफत पुरवतील ऑक्सिजन सिलिंडर

मुंबई आणि उपनगरातील अशाच काही संस्थाची यादी आम्ही तुम्हाला देत आहोत जे मोफत ऑक्सिजन सिलिंडर पुरवतात.

SHARES

मला श्वास घेता येत नाही, हे शब्द सध्या मिनिटा मिनिटांना घरात, रुग्णालयात ऐकू येत आहेत. रुग्णालयांमध्ये गरजेच्या औषधांप्रमाणेच ऑक्सिजनच्याही मागणी अन् पुरवठ्यात मोठी तफावत आहे. अनेकांना रुग्णालयातील बेडसाठी किमान दोन ते पाच दिवसांचे वेटिंग सांगितले जाते.

या काळात अनेकांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी स्थिर राखण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे आहे. या कसोटी काळात काही समाजसेवी संस्था आणि काही व्यावसायिक अनुक्रमे मोफत ऑक्सिजनचा पुरवठा करीत आहेत.

मुंबई आणि उपनगरातील अशाच काही संस्थाची यादी आम्ही तुम्हाला देत आहोत जे मोफत ऑक्सिजन सिलिंडर पुरवतात. जेणेकरून गरज असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता.


१) हेमकुंट फाउंडेशन : (Hemkunt Foundation)

गुडगाव आणि मुंबईत ही संस्था कामन करते. ही एक गैर-सरकारी संस्था (NGO) असून २०१० मध्ये याची स्थापना झाली. समुदाय विकास संचालक, हर्तीरथ सिंह यांनी ट्विटवरून, संस्थेचे काम पहाटेच्या ३ वाजेपर्यंत सुरू असल्याची माहिती दिली. ही संस्था त्यांच्या वर्सोवा गुरुद्वारामधून मुंबईला मोफत ऑक्सिजन सिलिंडर्स पुरवत आहे.

संपर्क : +91 8700013641

इमेल आयडी : hemkuntfoundation13@gmail.com


२) युनिटी अँड डिग्निटी फाउंडेशन

मुंबईत राहणाऱ्या शाहनवाज शेखनं ही संस्था सुरू केली होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजेच २०२० मध्ये युनिटी अँड डिग्निटी फाऊंडेशननं गरजूंना ऑक्सिजन सेवा पुरवण्याचं काम हाती घेतलं. आता सध्या ते फक्त कोरोना रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलिंडर पुरवत आहेत.

शाहनवाजनं यासाठी आपली कार विकली. मालवणीतील असलेल्या त्यांच्या केंद्रातून सुमारे ६००० सिलिंडर पुरवले गेले आहेत. शाहनवाज म्हणाले की, “आम्ही गरजू गरजूंना मोफत ऑक्सिजन पुरवण्यासाठी २४ ×७ काम करत आहोत. भिवंडीतील त्यांच्या स्त्रोतांकडून त्यांना दिवसाला ५० पर्यंत सिलिंडर्सचा अनियमित पुरवठा होतो.

ऑक्सिजन सिलिंडर्सचा अखंड पुरवठा करण्यासाठी ३२ वर्षीय या तरुणानं २०२० मध्ये सुमारे २२ लाख रुपयांची एसयूव्ही देखील विकली होती.

संपर्क : 9892012132


३) सेवा और सहयोग : (Seva Aur Sahyog)

घाटकोपर, ठाणे, नवी मुंबई इथं या संस्थेची एक एक केंद्र आहेत. आदित्य चौहान यांनी दशकांपूर्वी स्थापन केलेली संस्था कोविड १९ मध्ये बाधित झालेल्यांना दिलासा देण्यासाठी काम करत आहे. सध्या घाटकोपर, ठाणे आणि नवी मुंबई इथल्या त्यांच्या प्रत्येक केंद्रात त्यांच्याकडे १०० ऑक्सिजन सिलिंडरचा साठा आहे जो ते वितरीत करीत आहेत.

रेड क्रिसन्ट या संस्थेसोबत मिळून ते ऑक्सिजन सेवा मोफत देत आहेत. रेड स्क्रिसन्टनं छोट्या छोट्या मस्जिदित तात्पुरते ऑक्सिजन प्लांट उभारले आहेत. तिथूनच बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.   

संपर्क : 9082597161


४) स्पीड ऑक्सिजन (speed Oxygen)

घरात उपचार घेणाऱ्या रुग्णांना, गरजूंना मोफत ऑक्सिजन सेवा या संस्थेमार्फत देखील दिला जात आहे. सामाजिक भावनेतून वसईच्या स्पीड कंपनीनं हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी फक्त तुम्हाला काही कागदपत्र घेऊन जावी लागतील.

खालील कागदपत्र आवश्यक

  • कोविड पॉझिटिव्ह रीपोर्ट
  • आधार कार्ड
  • डॉक्टरांची चिठ्ठी

संपर्क : 9823910625 / 9923556483 / 9823202242

इमेल आयडी : speedoxygen@gmail.com


५) खुशिया

चिनू कवात्रानं खुशिया या संस्थेची स्थापना केली. २०२० मध्ये लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये गरजूंना धान्य पुरवणे, जेवणं वाटप असे अनेक उपक्रम त्याच्या संस्थेनं राबवले. आता अनंत या संस्थेसोबच हात मिळवत फ्री ऑक्सिजन सेवा नावाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत त्यांनी गरजूंना मोफत ऑक्सिजन पुरवला आहे.

संपर्क : 9619089050 / 7666657964 / 8879195215

वर दिलेल्या संस्थेशी आधी संपर्क साधून ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध आहे का? हे जाणून घ्या. असेल तर ते घरापर्यंत ऑक्सिजन सिलिंडर पुरवतात. त्यामुळे तुम्हाला घराबाहेर जाण्याची गरज नाही.

याशिवाय वरील संस्थांना आर्थिक मदत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधावा. शक्य असल्यास त्यांना मदतीचा हात द्यावा.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा