Advertisement

मिरा-भाईंदरमध्ये ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित

मिरा-भाईंदरमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला असून या ऑक्सिजन प्रकल्पाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आलं

मिरा-भाईंदरमध्ये ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित
SHARES

मिरा-भाईंदरमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला असून या ऑक्सिजन प्रकल्पाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आलं. या प्रसंगी महाराष्ट्र हे देशातील ऑक्सिजन बाबतीत स्वयंपूर्ण होणारं पहिलं राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

यावेळी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे नगरसेवक आदी उपस्थित होते.

या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं, दुसऱ्या कोरोना (coronavirus) लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावी विविध अडचणींचा सामना रुग्णाला करावा लागला होता. आता येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक जिल्ह्याने ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण व्हावं यासाठी युद्धपातळीवर काम चालू आहे.

हेही वाचा- मंत्रालयात दारूच्या बाटल्या आल्याच कशा?, प्रविण दरेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मिरा-भाईंदर महानगरपालिकेने विविध लोकोपयोगी विकासात्मक कामे केलेली आहेत. यामध्ये जलतरण तलाव तसंच नाट्यगृह यांचं काम प्रगतीपथावर आहे. कोरोना काळामध्ये सर्वात प्रथम ठाणे जिल्ह्याने ऑक्सिजन प्रकल्प उभारला होता. यामुळे ठाणे जिल्ह्याने ऑक्सिजन बाबतीत स्वयंपूर्ण झालेला पहिला जिल्हा होण्याचा मान मिळविला आहे.

कोविड झालेल्या व्यक्तीचं ऑक्सिजन कमी झालं असल्यास अशा व्यक्तीला ऑक्सिजनची आवश्यकता भासते. राज्य शासनाने कोविड हॉस्पिटलमध्ये मागील काळात ऑक्सिजन उपलब्ध करून दिला होता. मागील कोरोना लाटेचा अनुभव पाहता येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये कोणताही रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

कोरोनामुक्त गाव ही संकल्पना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्याची आवश्यकता आहे प्रत्येकाने आपलं गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न केले, तर महाराष्ट्र नक्कीच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा- ‘ते’ फक्त बोलण्यासाठीच मंत्री झालेत, नवाब मलिकांचा दानवेंना टोला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा