Advertisement

लॉकडाऊनच्या भीतीनं मानसिक आरोग्यावर परिणाम

राज्यत वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळं महाराष्ट्र लॉकडाऊनच्या वाटेवर आहे.

लॉकडाऊनच्या भीतीनं मानसिक आरोग्यावर परिणाम
SHARES

राज्यत वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळं महाराष्ट्र लॉकडाऊनच्या वाटेवर आहे. मात्र, अद्याप राज्य सरकार लॉकडाऊच्या निर्णयावर ठाम नाही. त्यामुळं नागरिकांच्या मनात लॉकडाऊनबाबत भीती असून, नैराश्य आणि भविष्याच्या चिंतेने अनेकांना ग्रासले आहे. पुन्हा लॉकडाऊन झाल्यास आर्थिक स्थिती बिकट होईल. रोजगार थांबेल. त्यामुळं राज्यातील व्यापारीवर्ग व सामान्य जनता 'लॉकडाऊन नको' अशी मागणी करत आहेत.

गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या लॉकडाऊनमुळं सामान्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाला. सतत कामात व्यस्त असणाऱ्या समान्यांना एकाच ठिकाणी इतका काळ राहण्याची सवय नसल्यानं त्यांना या मानसिक त्रासाला समोरं जावं लागत आहे.

मागील वर्षाप्रमाणे यंदाही लॉकडाऊन लावल्यास नागरिकांचं मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. तसंच, लॉकडाऊनमुळं विस्कटलेली घडी पुन्हा बसत आहे. मात्र, लॉकडाऊन पुन्हा लावल्यास रोजगार बंद होण्याची नागरिकांना सतावत आहे. संपूर्ण जगाला कोरोना विषाणू महामारीनं एक नवी जीवनपद्धतीच दिली आहे.

जसा जगण्यावर या महामारीचा परिणाम झाला तसा मनांवर पण प्रचंड परिणाम झाला. मानसिक अस्वस्थता वाढली, झोप गाढ लागेना, झोपच लागेना अशा तक्रारी अगदी प्रत्येकच जण करायला लागला. वर्क फ्रॉम होम जीवनशैलीमुळे घरातूनच काम केलं तरीही ते सतत करायला लागलं आणि बसायला लागल्यामुळे स्क्रीन टाईम वाढल्यामुळे शारीरिक व्याधीही जडल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा