फार्मासिस्टचे घंटानाद आंदोलन

मुंबई - नेहमी औषधांच्या दुकानात दिसणारे फार्मासिस्ट गुरूवारी आझाद मैदानावर घंटानाद करताना दिसले. एआयओसीडीच्या नॉन फार्मासिस्टला फार्मासिस्ट म्हणून मान्यता देण्याच्या प्रस्तावामुळं फार्मासिस्ट बेरोजगार होणार आहेत. याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले. नॉन फार्मासिस्टला फार्मासिस्ट म्हणून मान्यता दिली तर जनआरोग्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाला आता देशभरातून विरोध होतोय.

Loading Comments