चेंबूर - दत्तजयंतीच्या निमित्तानं देवनार पोलीस स्टेशनमध्ये नेत्रदान जनजागृती मार्गदर्शन अभियान आयोजित करण्यात आलं होतं. न्यू लाइफ फाउंडेशननं हे अभियान आयोजित केलं होतं. या वेळी 42 पोलिसांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला.
देवनार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय शिंदे यानी आपल्या पत्नीसह नेत्रदान करण्याचा संकल्प केला. तसंच नेत्रदान हे श्रेष्ठदान आहे. त्यामुळ सर्वांनीच नेत्रदानाचा संकल्प केला पाहिजे, असं आवाहन शिंदे यांनी या वेळी केलं.