Advertisement

कोविडनंतर, आरोग्य विम्याची मागणी भारतात वाढली

आरोग्य विम्याची सर्वाधिक मागणी दिल्ली, बंगळुरू आणि मुंबई या प्रमुख तीन टियर-I शहरांमध्ये आहे.

कोविडनंतर, आरोग्य विम्याची मागणी भारतात वाढली
SHARES

कोविड-19 नंतर भारतातील आरोग्य विम्याची मागणी ३२१% वाढली आहे. जस्ट डायलनुसार स्टार हेल्थ, मॅक्स बुपा, आदित्य बिर्ला, एचडीएफसी एर्गो, आणि एको या पाच प्रमुख कंपन्यांना नागरिकांकडून अधिक प्राधान्य दिलं जातं आहे.

एप्रिल-मे-जून 22 या तिमाहीतील सर्चमध्ये YOY (year on year) 3X ने वाढ झाली आहे. तर QoQ (Quaiter on quarter) ची वाढ 252% इतकी होती आणि आरोग्य विम्याच्या मागणीच्या जवळपास 61 टक्के टियर-I म्हणजेच मुंबईचे वर्चस्व आहे.

जस्ट डायलचे सीएमओ प्रसून कुमार म्हणाले: “COVID-19 नंतर, आम्ही प्लॅटफॉर्मवर आरोग्य विम्याच्या मागणीत वाढ पाहत आहोत. कोविडच्या प्रभावामुळे टियर-II शहरे (चंदिगढ) आणि शहरांमध्ये आरोग्य विम्यांची मागणी वाढली आहे. टियर-I (मुंबई) च्या तुलनेत टियर-II शहरांमध्ये विम्याला अधिक मागणी आहे. येत्या काही दिवसांत याला आणखी गती मिळेल असा आम्हाला अंदाज आहे. आमचा डेटा सूचित करतो की टियर-I शहरांमध्ये विम्यासाठी मागणी (YOY) वाढीचा दर 3X वाढला आहे आणि टियर-II मध्ये तो 5.7x होता. वाढत्या मागणीच्या अनुषंगाने, आम्ही जस्ट डायल द गो टू सर्च प्लॅटफॉर्म बनवून विमा उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसह प्लॅटफॉर्म वाढवत आहोत.“

आरोग्य विम्याची सर्वाधिक मागणी दिल्ली, बंगळुरू आणि मुंबई या प्रमुख तीन टियर-I शहरांमध्ये आहे.

आरोग्य विम्याव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय प्रवास विम्याच्या मागणीत देखील 44% QoQ ची लक्षणीय वाढ दिसून आली आहे.

ट्रॅव्हल इन्शुरन्ससाठी यातील बहुतांश मागणी ही टियर-I शहरांमधून आली आहे ज्यात 28% (QoQ) वाढ झाली आहे. तर टियर-II शहरांमध्ये मागणी तुलनेने 18% ने वाढली आहे. दिल्लीत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सर्वाधिक मागणी दिसली. ज्यामुळे प्रवास विम्याची 282 टक्के वाढ झाली, त्यानंतर मुंबई आणि बेंगळुरूचा क्रमांक लागतो.



हेही वाचा

18+ लोकांना मोफत कोरोना बूस्टर डोस, ‘या’ तारखेपासून मिळणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा