Advertisement

दिवाळीत फटाके फोडताय? मग हे वाचा!


दिवाळीत फटाके फोडताय? मग हे वाचा!
SHARES

दिवाळी म्हटलं की फराळ, मिठाई, आतिषबाजी, आकर्षक रोषणाई! पण, लहान मुलांना सर्वात जास्त आकर्षण ते म्हणजे फटाक्यांचं. पण तुम्ही जर फटाके फोडणार असाल, तर काय काळजी घ्याल? आणि कोण-कोणत्या प्रकारचे फटाके फोडण्यापासून आपल्या मुलांना थांबवू शकाल? याचा एकदा तरी पालकांनी विचार करायलाच हवा. दिवाळीमध्ये अनेकदा फटाके उडवताना भाजण्याच्या घटना घडल्याचं आपण ऐकतो. पण, अशा वेळी त्या व्यक्तीवर तातडीने उपचार झाले पाहिजेत. त्यासाठी काय काळजी घ्यावी लागेल, यासाठी लोकमान्य टिळक रुग्णालयातील 'बालरोगतज्ज्ञ विभागाच्या प्राध्यापक मोना गजरे' यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना काही उपाय सुचवले आहेत.फटाके फोडाल, तर ही काळजी घ्या...

आपलं संपूर्ण शरीर झाकेल असे कपडे घालावेत

कॉटन कपड्यांचा वापर करा

मोठ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच मुलांनी फटाके फोडावेत

नायलॉनचे कपडे लगेच जळण्याची शक्यता असते, त्यामुळे ते घालणे टाळावे

छोट्या मुलींना हिल्स सॅंडल्स घालायला देऊ नयेत. त्यामुळे त्यांचा पाय मुरगळण्याची शक्यता असते

मुलींनी केस बांधून ठेवावेत


शिवाय, फटाके फोडत असताना भाजलात तर तत्काळ काय उपाय करु शकता? हेही त्यांनी सुचवले आहे.


भाजल्यानंतर काय कराल?

फटाके फोडत असताना अचानक भाजलात तर भाजलेल्या ठिकाणी पाण्याचा मारा करावा

डोळ्यात धूर गेल्यास तोंड आणि डोळे स्वच्छ पाण्याने आणि साबणाने धुवावेत

फटाक्यांच्या धुराचा सर्वात जास्त त्रास होतो तो श्वसननलिकेवर आणि फुप्फुसावर. त्यासाठी नाकाला फडके बांधा. म्हणजे श्वसनाचा त्रास होणार नाही


कोणकोणत्या प्रकारचे फटाके फोडू शकता?

खरंतर आपण दिवाळी फटाकेरहितही साजरी करु शकतो. पण, हे लहान मुलांना समजावणं पालकांना कठीण जातं. त्यामुळे मुलांच्या हट्टापायी पालक फटाके फोडू देतात. पण, मुलांनी कोणते फटाके फोडावेत याचं नियंत्रणही पालकांवर असतं.

फटाक्यांमध्ये लहान मुलांसाठी खास तयार केलेले प्रकार मिळतात. जसे की, फुलबाजी, सुरसुरी किंवा टिकली फटाका. लहान मुलांना मोठे फटाके फोडायाला देऊ नयेत. चक्र, पाऊस, रॉकेट असे मोठे फटाके देऊ नयेत. त्यामुळे जर भाजलात, तर त्याची खूप मोठी जखम होऊ शकते.हेही वाचा

मुंबईतल्या दिवाळीचे खरे कलाकार धारावीत!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा