मुंबईतल्या दिवाळीचे खरे कलाकार धारावीत!


SHARE

मुंबई शहरात दिवाळी म्हटलं, तर रोषणाई जल्लोष आणि पणत्यांची आरास ही आलीच! दिवाळी दरम्यान पणत्या खरेदीला विशेष गर्दी होते ती धारावीच्या कुंभार वाड्यात. धारावीमध्ये वर्षभर विविध उद्योग चालतात. पण दिवाळीदरम्यान कुंभारवाड्यात प्रामुख्याने दिसून येतात त्या विविध प्रकारच्या पणत्या!धारावीत लहान-मोठा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पण त्यासोबतच या भागात नोकरदारही राहतात. नोकरी करणारे दरवर्षीप्रमाणे दिवाळीत खास सुट्टी घेतात आणि पणत्या बनवण्याच्या कामात गुंग होतात.यंदाचे आकर्षण

यावर्षी धारावीत डबल दिया पणती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये खालच्या राऊंडमध्ये ६ पणत्या आणि वरच्या राऊंडमध्ये ५ पणच्या, अशी या दिव्यांची रचना आहे. १५൦-२५൦ रुपयांपर्यंत या पणत्या बाजारात उपलब्ध आहेत.


दिवाळीनिमित्त पणत्या बनवण्याचा व्यवसाय माझ्या पणजोबांनी सुरू केला होता. ३൦ वर्षांपासून मी हा व्यवसाय सांभाळत आहे. आमच्या इथून एजंटद्वारे पणत्या अनेक ठिकाणी विक्रीसाठी नेल्या जातात. दिवाळीत या कामासाठी 15 व्यक्ती पणत्या तयार करण्यासाठी तर 8 लोक पणत्या पॅक करण्याचं काम करतात.

तुषार चौहान, विक्रेते, कुंभारवाडाडिझाईनचे वेगळेपण

यावर्षीही कुंभारवाड्यात वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या उपलब्ध आहेत. गुजराती पद्धतीचे दिवे, महाराष्ट्रीयन पद्धतीच्या पणत्या, मटका पणती, वृंदावन अशा विविध आकाराच्या पणत्या पाहायला मिळत आहेत. लेस, खडे, मनी, माती, चमक यांचा वापर करून पणत्यांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. अगदी १൦ रुपयांपासून ते ४൦൦ रुपये किंमतीच्या पणत्या बाजारात उपलब्ध आहेत.मुंबई शहरातील सर्व मुख्य बाजारपेठांमध्ये या पणत्या विक्रीसाठी ठेवल्या जातात. अनेक व्यापारी या पणत्या धारावीतून होलसेल दरात खरेदी करून मार्केटमध्ये विक्रीसाठी ठेवतात. फक्त मुंबईतच नाही, तर कुंभारवाड्यातील पणत्या कोलकाता, पुणे, दिल्ली इथल्या बाजारपेठेत विक्रीसाठी जातात.


दिवे बनवण्यामागे कुंभारांची मेहनत

लाल, पांढऱ्या आणि काळ्या अशा तीन प्रकारांच्या मातीतून पणत्या साकारल्या जातात. कोलकाता, गुजरात, राजस्थान, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर इथून माती आणली जाते. पणत्या बनवताना प्रथम माती सुकवून ती पुन्हा पाण्यात भिजवली जाते. त्यानंतर मातीला मळून तिचे गोळे बनवले जातात. या गोळ्याला फिरत्या चाकावर ठेवून ओलसर पाण्यानं आकार देत पणत्या बनवल्या जातात. या पणत्या उन्हात सुकवून पुन्हा भट्टीत ठेवल्या जातात. छोट्या पणती बनवण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. तर मोठ्या पणत्यांसाठी चार ते पाच दिवस लागतात. मग त्यानंतर पणत्यांवर रंगकाम केले जाते. पणत्या बनवण्यामागे कुंभारांसोबतच अनेकांचे हात आहेत. कठीण परिश्रम करून या पणत्या साकारल्या जातात. त्यामुळे बाजारात आलेल्या चायनिज पणत्या घेण्यापूर्वी यांच्या मेहनतीचा नक्कीच विचार करा!हेही वाचा

दिवाळी स्पेशल करायचीये? मग लोकरीचे कंदील लावा!

 

संबंधित विषय