ती आली..तिला थांबवलं..पण ती सुटली!

 Pali Hill
ती आली..तिला थांबवलं..पण ती सुटली!
ती आली..तिला थांबवलं..पण ती सुटली!
See all

मुंबई - डोंबिवली स्थानकाजवळ रुळांलगत राहणाऱ्या रहिवाश्यांनी गुरुवारी रेल्वे रोकोचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून तातडीनं पावलं उचलण्यात आल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक रुळांवरच राहिली. मुंबईकडे येताना डोंबिवली स्थानकापासून कोपरपर्यंत असलेल्या वस्तीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येणार होती. या कारवाईबाबत वृत्त समजताच या वस्तीतले रहिवासी रुळांत उतरले आणि त्यांनी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना तातडीनं हटवण्यात आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली नाही, असं मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

Loading Comments