Advertisement

दहिसर, बोरीवली, कांदिवलीतील रुग्णवाढ चिंताजनक

दहिसर, बोरिवली, कांदिवलीमध्ये दिवसेंदिवस रुग्ण वाढीचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पालिकेसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

दहिसर, बोरीवली, कांदिवलीतील रुग्णवाढ चिंताजनक
SHARES
दहिसर, बोरीवली, कांदिवलीमध्ये दिवसेंदिवस रुग्ण वाढीचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पालिकेसाठी चिंतेचा विषय बनला आहे. मुंबईमधील कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा काळ सरासरी २८ दिवसांवर आला आहे. तर रुग्ण वाढीचा दर २.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. दहिसर, बोरीवली, कांदिवलीमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा काळ कमी सर्वाधिक आहे.  कांदिवली आणि बोरीवलीमधील रुग्ण दुपटीचा काळ प्रत्येकी १७ दिवस आहे. तर दहिसरमधील रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १३ दिवस आहे.


 मार्च-एप्रिलमध्ये भायखळा परिसरातील रुग्णसंख्या सातत्याने वाढत होती. मात्र येथील उपाययोजनांमुळे या परिसरातील रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ४८ दिवस आहे. माटुंगा परिसरातील रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ६२ दिवस तर धारावीमधील हा काळ ४४ दिवस आहे.

माटुंगा परिसरात नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण १.१ टक्क्यांवर आलं आहे.  दहिसरमध्ये हाच कालावधी ५.६ टक्के इतका आहे. मुंबईतील अन्य परिसरांच्या तुलनेत तो सर्वाधिक आहे. त्याखालोखाल बोरीवली आणि कांदिवलीमध्ये हेच प्रमाण अनुक्रमे ४.३ टक्के व ४.१ टक्के इतके आहे.

एफ उत्तरमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून ६० दिवसांवर पोहोचला आहे. तर रूग्ण वाढीचं प्रमाण १.२ टक्के असं सर्वात कमी आहे. एच पूर्वमध्ये रुग्ण दुप्पट व्हायला ५७ दिवस लागलेले असून तेथील रुग्ण वाढीचा सरासरी दर एफ उत्तरप्रमाणे १.२ टक्के आहे. 

एम पूर्व ,  एल आणि ई  या भागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५ दिवसांपेक्षा जास्त आहे. तर रुग्णवाढ सरासरी   टक्के पेक्षा कमी आहे. याशिवाय जी उत्तरमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४ असून बी विभागात ४ दिवस आहे. 


हेही वाचा -  

मुंबई महापालिकेला मिळणार ८५ नव्या रुग्णवाहिका

Coronavirus Updates: उबर अॅपवरून बुक करा रुग्णवाहिका


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा