Advertisement

कोरोना व्हायरस: साई बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत भक्तांची गर्दी कमी

कोरोना व्हायरसमुळं (Corona Virus) लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील भक्तांची गर्दी कमी झाली आहे.

कोरोना व्हायरस: साई बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत भक्तांची गर्दी कमी
SHARES

जगभरातून अनेक भाविक शिर्डीत (Shirdi) साई बाबांच्या (Sai Baba) दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. मात्र, सध्या चर्चेत असलेल्या कोरोना व्हायरसमुळं (Corona Virus) लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील भक्तांची गर्दी कमी झाली आहे. त्यामुळं कोरोना व्हायरसचा परिणाम शिर्डीतही जाणवत असल्याचं समोर येत आहे. कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य (Viral) असल्यानं भाविक दर्शनासाठी येण्यास टाळत आहेत.

कोरोना व्हायरच्या भितीमुळं अनेक नागरिक बाहेर पडणं टाळत आहेत. त्यामुळं शिर्डीतही भाविकांची गर्दी कमी दिसत आहे. साई बाबांच्या दर्शनावेळी भाविक मौल्यवान वस्तू, पैसे हे मोठ्या प्रमाणात दान करत असून, दरवर्षाला कोटी रुपयांचं दान दानपेटीत जमा होतं. मात्र, कोरोना व्हायरसच्या भितीनं नागरिक जात नाहीत.

या कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेत शिर्डीतील साईबाब संस्थेनं देखील सुरक्षेच्या दृष्टीनं सर्दी, खोकला आणि ताप असलेल्यांना साई बाबांच्या दर्शनास न येण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळं अनेक भाविक येत नसल्याचं म्हटलं जात आहे. या कोरोना व्हायरसमुळं आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.



हेही वाचा -

मिलिंद एकबोटे राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबईत बनावट नोटांचा सुळसुळाट, व्यवहार करताना घ्या काळजी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा