सायन रुग्णालयात डॉक्टरांचा कँडल मार्च

 Sion
सायन रुग्णालयात डॉक्टरांचा कँडल मार्च
सायन रुग्णालयात डॉक्टरांचा कँडल मार्च
सायन रुग्णालयात डॉक्टरांचा कँडल मार्च
See all

सायन - मुंबईतल्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील निवासी डॉक्टर रोहित कुमार यांना मारहाण झाल्याने डॉक्टर्स आक्रमक झाले आहेत. या सर्व संतप्त डॉक्टर्सनी या मारहाणीविरोधात रविवारी कँडल मार्च काढत निषेध व्यक्त केला. दरम्यान या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. मात्र या आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती सायन पोलिसांनी दिली.


सायन रुग्णालयात गेल्या अनेक महिन्यांपासून एक रुग्ण उपचार घेत होता. मात्र शनिवारी त्याचे निधन झाले. डॉक्टर्सनी प्रयत्न करूनही रुग्ण वाचू शकला नाही. विशेष म्हणजे आधीच रुग्णाच्या नातेवाईकांना डॉक्टर्सनी शाश्वती देऊ शकत नाही असं सांगूनही रुग्णांच्या नातेवाईकांनी कर्तव्यावर असलेल्या अपंग डॉक्टर्सला मारहाण केली. दरम्यान येथे असणारे अपुरे सुरक्षारक्षक दोन शिफ्टमध्ये कशी डॉक्टर्सची सुरक्षा करणार असा सवाल डॉक्टर्सनी उपस्थित केला आहे. तसेच रिक्त असलेल्या सुरक्षारक्षकांची पदे लवकर भरली जावीत अशी मागणी डॉक्टर्स संघटनेने केली आहे.

Loading Comments