Advertisement

'सेव्ह आराध्या' मोहीम


'सेव्ह आराध्या' मोहीम
SHARES

'आराध्या मुळे' या 4 वर्षांच्या चिमुकलीला हृदयाचा आजार झाला आहे आणि तिला वाचवण्यासाठी हृदय प्रत्यारोपण करण्याची गरज आहे. तिच्या हृदय दानासाठी सोशल मीडियावर गेल्या महिन्याभरापासून मोहीम राबवली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागांत सोशल मीडियाद्वारे 'सेव्ह आराध्या' ही मोहीम सुरू आहे.

सायनमध्ये बिपीन म्हात्रे रुग्णसेवा प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने शनिवारी 8 एप्रिलपासून फेसबुक,वॉटस्अॅपद्वारे सायन आणि आसपासच्या परिसरात अवयव दानाची जनजागृती मोहीम राबवली जात आहे. शनिवारी सायन आणि आसपासच्या परिसरात सोशल मीडियावर एक वेगळेच वातावरण दिसून आले. 4 वर्षांच्या आराध्याला कार्डिओ मायोपॅथी हा हृदयाचा आजार जडला आहे. आराध्याची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. तिच्यावर हृदय प्रत्यारोपण केले तरच तिचे प्राण वाचणार आहेत. त्यासाठी तिला मेंदूमृत 2 ते 8 वर्षाच्या बालकाचे हृदय मिळण्याची गरज आहे. हृदय प्रत्यारोपण हा एकमेव मार्ग असून, तिच्यासाठी हृदय दान करू शकेल अशा दाम्पत्यांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी शनिवारी सायनमध्ये दिवसभर बिपीन म्हात्रे रुग्णसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सायन आणि आसपासच्या परिसरात आराध्यासाठी फेसबूक,वॉटस्अप वर पोस्ट फिरत होत्या.

Save Aradhya या मोहिमेद्वारे खऱ्या अर्थाने सोशल मीडियाचा वापर तरुणांकडून करण्यात आला आणि आराध्याच्या आजार, उपचार याबद्दल माहितीसाठी www.mymedicalmantra.com या संकेत स्थळाला भेट देऊ शकता.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा