Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,87,521
Recovered:
57,42,258
Deaths:
1,18,795
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,453
570
Maharashtra
1,23,340
8,470

एनएसएसच्या शिक्षकांनो, ७ डिसेंबरला अवयवदानाचं प्रशिक्षण नक्की घ्या!


एनएसएसच्या शिक्षकांनो, ७ डिसेंबरला अवयवदानाचं प्रशिक्षण नक्की घ्या!
SHARES

अवयवदान ही खरंतर येत्या काळाची गरज आहे. ही गरज आणि त्याचं महत्त्व समजून सांगण्यासाठी येत्या ७ डिसेंबरला केईएम रुग्णालयात एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे.

या कार्यशाळेचं वैशिष्ट्य म्हणजे महाविद्यालयातील एनएसएसच्या शिक्षकांना अवयवदानाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रिजनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लान्ट ऑर्गनायझेशन (रोटो) द्वारे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.


म्हणून या कार्यशाळेचं आयोजन 

एनएसएसच्या शिक्षकांना अवयवदानाचं महत्त्व समजून सांगण्याचं महत्त्व म्हणजे हे शिक्षक विद्यार्थ्यांच्या मदतीनं राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजात पथनाट्यांद्वारे अवयवदानाबाबतची जनजागृती करू शकतील. याव्यतिरिक्त शाळेतच विद्यार्थ्यांना अवयवदानाबाबतची माहिती आणि महत्त्व पटू शकेल.


अवयवदान किती महत्त्वाचं आहे हे समजून सांगण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) द्वारे प्रत्येक महाविद्यालयात कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. पण, अनेकदा रोटोच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहणं शक्य होत नाही. त्यामुळे महाविद्यालयांमधील एनएसएस समन्वयक आणि शिक्षकांना अवयवदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी ही कार्यशाळा भरवण्यात येणार आहे.

- डॉ. कामाक्षी भाटे, समन्वयक, रोटो

महाविद्यालयातील शिक्षकांना अवयवदानाचं महत्त्व सांगण्यासाठी केईएम रुग्णालय, रोटो आणि मुंबई विद्यापीठ यांच्यातर्फे या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे.  तरुण पिढीत अवयवदानाची जागरुकता निर्माण व्हावी यासाठी एनएसएस शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे.


मुंबईत सध्या ३२० महाविद्यालयं आहेत. या कार्यक्रमात ११५ महाविद्यालयातील साधारणतः २०० एनएसएस समन्वयांचा समावेश असणार आहे. मुंबईसह विरार, कल्याण आणि वाशी येथील महाविद्यालयातून शिक्षकांचा समावेश असेल.

- प्रा. बाबासाहेब बिडवे, एनएसएस प्रोग्रोम को-ओर्डिनेटर, मुंबई विद्यापीठ


कार्यशाळेत दिली जाणारी माहिती

  • अवयव दानाचं महत्त्व
  • अवयवदान का करावेत
  • अवयवदान कोण करू शकतं
  • एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे किती जणांचा प्राण वाचू शकतो
  • डोनर कार्ड म्हणजे नेमकं काय? त्याचा वापर कसा करायचा?
  • मुंबईत जळीत (बर्न) रुग्णांची संख्या किती आहे
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा