Advertisement

ज्येष्ठ नागरिकांचा लस घेण्यासाठी उत्साह

मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये सोमवारपासून लसीकरणच्या तिसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली.

ज्येष्ठ नागरिकांचा लस घेण्यासाठी उत्साह
SHARES

मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये सोमवारपासून लसीकरणच्या तिसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली. यामध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक आणि ४५ पेक्षा जास्त वय असलेले परंतु आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे. देशातील ज्येष्ठ नागरिकांना १ मार्चपासून कोरोना लस देण्याच्या तिसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली.

आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर्स यांचा अल्प प्रतिसाद मिळत असताना ज्येष्ठ नागरिकांनी मात्र लस घेण्यासाठी केंद्रांवर प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी सकाळी कोविन अ‍ॅपची लिंक सुरू होताच नागरिकांनी त्यावर नोंदणी करून तातडीनं लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी रांगा लावल्या. लस घेतल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वाहत होता.

मुंबई महापालिकेनं पहिल्या दिवशी ८ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था केली होती. यातील ५ केंद्रांवर मोफत आणि ३ केंद्रांवर सशुल्क लसीची व्यवस्था केली होती. मोफत लस असलेल्या ५ केंद्रांपैकी वांद्रेतील बीकेसी जम्बो कोविड सेंटरवर नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आली. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र प्रमुखांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. 

कोविन अ‍ॅपवर तांत्रिक अडचणी कायम

ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लस घेण्यासाठी उत्साह दाखवत कोविड सेंटरवर गर्दी केली. मात्र नोंदणी करताना कोविन अ‍ॅपवर येणार्‍या अडचणींचा पाढाही त्यांनी यावेळी वाचला. ८५ वर्षीय हंसराज असर यांचा मुलगा योगेशने कोविन पोर्टल ९ वाजता सुरू होणार होते. परंतु प्रत्यक्षात ते ११ वाजता सुरू झाले. मात्र त्यानंतरही त्यामध्ये नोंदणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा